शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

पर्सनल गॅजेटमध्ये नवीन काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:51 AM

अन्न, वस्त्र, निवारा, यानंतर तंत्रज्ञान ही जगण्याची मूलभूत गरज, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

अन्न, वस्त्र, निवारा, यानंतर तंत्रज्ञान ही जगण्याची मूलभूत गरज, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. सकाळी आपल्याला झोपेतून उठविण्यापासूनच पर्सनल गॅजेट आपली साथ देऊ लागले आहेत. मोबाइलमध्ये अलार्मपासून ते आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या अलेक्सा किंवा गुगल असिस्टंटसारख्या फीचरपर्यंत सर्व काही पर्सनल गॅजेटमध्ये सामावलेले असते. त्यामुळेच २०२० हे नवे वर्षही अनेक नव्या गॅजेट्सची भेट देणारे ठरणार आहे.ब्लू टूथ स्पीकर, स्मार्टवॉच, फिटनेस बँड अशा अनेक गॅजेटची बाजारात सध्या रेलचेल पाहायला मिळत आहे. कनेक्टिव्हिटीच्या साहाय्याने एकाच पर्सनल गॅजेटला इतर सर्व गॅजेट जोडली जातात. त्यामुळे एकाच गॅजेटच्या माध्यमातून ‘मल्टिटास्किंग’ करणे सोपे जाते. अ‍ॅपल, फॉसिल, एमआय, फिटबिट सारख्या अनेक कंपन्यांची अद्ययावत स्मार्टवॉच नवीन वर्षात बाजारात नवी फीचर्स घेऊन दाखल होणार आहेत. स्मार्ट गॅजेट खरेदी करताना वॉरंटी, एक्स्टेंडेड वॉरंटी, क्वालिटी अशा अनेक निकषांचा विचार करावा लागतो. गॅजेट खरेदी करताना चेकलिस्ट, रिव्ह्यू, कंपनीची विश्वासार्हता, मॅन्युफॅक्चरिंग या गोष्टींची खात्री करून घ्यायला हवी.नव्या वर्षात स्मार्टवॉचप्रमाणेच दररोजचे आयुष्य सोपी करणारी अनेक गॅजेट्स बाजारात दाखल होत आहेत. अ‍ॅपल कंपनीतर्फे एकोबीट हे वायरलेट हेडफोनचे नवे व्हर्जन बाजारात येत आहे. कारच्या इंजिनमध्ये काही बिघाड असेल, तर ते दाखविणारे फिक्स्ड हे नवीन गॅजेट खास आकर्षण ठरेल. कारच्या इंजिनमधील संभाव्य बिघाड लक्षात घेऊन या गॅजेटमध्ये वॉर्निंग लाइट लागू शकेल. ड्रोन एक्स (पर्सनल फोटोग्राफर गॅजेट), टॅपएनचार्ज (वायरलेस चार्जिंग पॅड), आयट्रॅक (कार जीपीएस ट्रॅकर), इलेक्ट्रिक टूथब्रश, ट्रान्सलेशन असिस्टंट असे अनेक गॅजेट ‘नेक्स्ट जेन’ म्हणून ओळखले जात आहेत.‘लोकमत’शी बोलताना संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ‘गॅजेटच्या बाबतीत सध्या अ‍ॅपल आणि सॅमसंगमध्ये स्पर्धा सुरू आहे. गुगलही या स्पर्धेत उतरले आहे. ट्रॅकर्स, पर्सनल सिक्युरिटी गॅजेट्स, अलर्ट गॅजेट असे वैविध्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. कधी आणि कोणते गॅजेट वापरायचे, याचे भान पाळणेही अवघड आहे. एकाच वेळी अनेक गॅजेट वापरणेही अडचणीचे ठरू शकते. सध्या स्मार्ट फोन हे एकच पर्सनल गॅजेट मला उपयुक्त वाटते. टॅब्लेटची ८० टक्के फीचर्स स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. स्मार्ट गॅजेटबद्दल कमालीचे आकर्षण वाटत असले, तरी ती खूप महागडी आहेत. त्यांची किंमत ५०,००० रुपयांच्या पुढे आहेत. गॅजेटमध्ये सातत्याने नवीन टेक्नॉलॉजी, नवे व्हर्जन येत असल्याने एकदा खरेदी केलेले गॅजेट दोन वर्षांत आउटडेटेड होते. त्यामुळे यासाठी किंमत किती मोजायची, हा वैयक्तिक प्रश्न आहे. बाजारात आलेले प्रत्येक गॅजेट आपण वापरलेच पाहिजे, असे नाही. यापेक्षा आपल्याकडे असलेल्या गॅजेटचा जास्तीतजास्त वापर कसा करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. स्मार्टफोनमधील ६० टक्के फीचर्सही आपण वापरत नाही. विविध अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून, त्यांचा अभ्यास करून उपयुक्तता लक्षात येऊ शकते.’

टॅग्स :technologyतंत्रज्ञान