शहरं
Join us  
Trending Stories
1
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
2
उपराष्ट्रपतीपद भाजपकडेच ठेवण्याचा प्रयत्न; एनडीएतील घटक पक्षांशी चर्चा
3
आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२५ : या राशीला नशिबाची साथ लाभेल, धन प्राप्तीचे योग
4
ना नोकरी, ना सॅलरी तरीही मिळालं ५.५० कोटींचं कर्ज; SBI मध्ये मोठा घोटाळा उघड, १८ जण अटकेत
5
भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; ९९ टक्के भारतीय वस्तूंच्या निर्यातीवर शुल्क नाही
6
गाझामध्ये पूर्ण युद्धबंदी लागू करा, भारताचे आवाहन; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडले मत   
7
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ठरले भारी, कोलंबिया विद्यापीठ नमले! आता सरकारला २२० दशलक्ष डॉलर देणार
8
संसदेत गोंधळामुळे चौथ्या दिवशीही कोंडी; दोन्ही सभागृहांचे कामकाज पुन्हा तहकूब
9
रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात
10
ताईसाहेबांचे सासर, माहेर कोणते? मतदारांना मतपत्रिकेवर समजणार!
11
सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश
12
कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?
13
अनिल अंबानींशी संबंधित ३५ ठिकाणी ईडीचे धाडसत्र; निवासस्थानी मात्र कारवाई नाही
14
स्विगी-झोमॅटो : ‘गिग’ कामगारांना हवी कायद्याची सुरक्षा
15
मातृभाषेचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचाही सन्मान करावा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
संपादकीय : बीसीसीआयला 'सरकारी' वेसण! ऑलिम्पिकच्या दिशेने मोठे पाऊल
17
७/११ : आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला ‘सुप्रीम’ स्थगिती; आरोपी बाहेरच राहणार! पण.. 
18
सवतीचे घर बळकावण्यासाठी क्रेनचा वापर; साथीदारांसह घरात घुसून केली मारहाण
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
20
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   

'Vine' ॲप पुन्हा सुरू होणार, Tiktok सारखा प्लॅटफॉर्म असणार? Elon Musk यांच्याकडून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 10:52 IST

Vine App : पोलद्वारे इलॉन मस्क यांनी वाइनला परत आणायचे का, असा प्रश्न युजर्सना विचारला आहे.

नवी दिल्ली : ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) हे व्हिडिओ ॲप वाइन (Vine) पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक Bring Back Vine? च्या नावाने पोल पोस्ट केली आहे. या पोलद्वारे इलॉन मस्क यांनी वाइनला परत आणायचे का, असा प्रश्न युजर्सना विचारला आहे. इलॉन मस्क यांच्या या ट्विटवर अनेक युजर्सनी मत दिले, तर अनेक युजर्सनीही ट्विट करून आपले विचार सुद्धा मांडले आहेत.

इलॉन मस्क यांचे हे ट्विट Vine च्या पुनरागमनाकडे इशारा करत आहे. एका यूजरने ट्विट करून लिहिले की, 'मला वाटते की वाइनला परत आणणे ही चांगली कल्पना असेल. दरम्यान, एकेकाळी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करण्यासाठी फक्त Vine ॲपचा वापर केला जात होता. ट्विटरने ऑक्टोबर 2012 मध्ये Vine ॲप विकत घेतल्याचे वृत्त आहे. या ॲपचे 200 मिलियनहून अधिक ॲक्टिव्ह मंथली युजर्स होते. 

प्लॅटफॉर्मने आपल्या स्थापनेपासून 1.5 बिलियन लूप पाहिले आहेत. Vine नावाच्या या ॲपवर 6 सेकंदाची लूपिंग व्हिडीओ क्लिप शेअर केली जाऊ शकत होती, परंतु कंपनीने 2016 मध्ये Vine ॲपची सेवा बंद केली. नंतर ते Vine कॅमेरामध्ये बदलण्यात आले. Vine कॅमेरा ॲपमध्ये युजर्संना 6.5 सेकंदांचा लूपिंग व्हिडिओ शूट करण्यासाठी मिळत होते.

Vine बनणार TikTok सारखे प्लॅटफॉर्म?ट्विटरचे मालक झाल्यानंतर इलॉन मस्क यांची कर्मचाऱ्यांसोबत पहिल्यांदाच चर्चा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीत या विषयावर चर्चा करताना इलॉन मस्क म्हणाले की, आम्हाला Tiktok सारखे ॲप म्हणून Vine विकसित करायचे आहे, जिथे 'अपमानास्पद टिप्पण्या' देखील परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, यासोबतच इलॉन मस्क यांनी अशा कमेंट्सचा प्रचार करू नये, असेही स्पष्ट केले आहे. तसेच, इलॉन मस्क यांनी आपल्या ट्विटर कर्मचार्‍यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, एक बिलियन युजर्सपर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला TikTok सारखे प्लॅटफॉर्म बनवावे लागेल.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्कTik Tok Appटिक-टॉकtechnologyतंत्रज्ञान