शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या मेमरी कार्डवरील छोटं बटन तुमच्या सुरक्षेसाठी आहे महत्वाचं; फोटोज जाऊ शकतात वाया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 13:04 IST

DSLR कॅमेऱ्यात एक मोठं मेमरी कार्ड वापरलं जातं, या कार्डवरील बटनचा नेमका उपयोग तरी काय?  

बऱ्याचदा आपल्या आयुष्यातील अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. या छोट्या गोष्टी देखील खूप उपयुक्त असतात. खासकारून टेक गॅजेट्सवरील प्रत्येक गोष्ट काही कारणास्तव देण्यात येतात. परंतु आपण कधी त्या फीचर्सचा वापर न केल्यामुळे आपल्याला त्यांची माहिती नसते आणि आपण ती घेत देखील नाही. असंच एक छोटंसं बटन DSLR मध्ये वापरण्यात येणाऱ्या मेमरी कार्डमध्ये दिलं जातं.  

मेमरी कार्ड स्मार्टफोनमधील असो किंवा कॅमेऱ्यातील दोन्ही खास डिवाइसेससाठी डिजाइन करण्यात आले आहेत. दोन्हीच्या डिजाईनमध्ये देखील मोठा फरक असतो. मोठ्या कार्डचा वापर कॅमेऱ्यात केला जातो त्याची रचना देखील त्यानुसार बनवली जाते. छोट्या एसडी कार्डपेक्षा याचा आकार तीनपट मोठा असतो.  

तसेच्या छोट्या कार्डपेक्षा काही फिचर देखील यात जास्त दिले जातात. ज्यात डावीकडे असलेल्या एका छोट्याश्या बटनचा देखील समावेश आहे. हे बटन वर-खाली करता येतं. हे बटन ऑन ऑफ करून महत्वाचं फिचर अ‍ॅक्सेस करता येतं, ज्याची माहिती अनेकांना नसते. जे लोक याचा रोज वापर करतात त्यांना देखील या बटनाचा वापर काय असतो ते माहित नसतं.  

जाणून घ्या उपयोग 

कॅमेऱ्यात वापरलं जाणारं मेमरी कार्ड लॉक करण्यासाठी या बटनचा वापर केला जातो. याला लॉक मोडवर ठेऊन मेमरी कार्डचा वापर केल्यास कॅमेऱ्यातून फोटो काढता येणार नाही. तसेच यातील फाईल्स देखील कॅमेऱ्यात दिसणार नाहीत. तसेच क्लिक केलेले फोटो आणि व्हिडीओ देखील सेव्ह होणार नाहीत. त्यामुळे या मेमरी कार्डचा वापर करताना मेमरी कार्ड अनलॉक मोडवर आहे का याची खात्री करून घ्यावी नाही तरी तुम्ही क्लिक केलेले फोटो सेव्ह होणार नाहीत आणि मेहनत वाया जाऊ शकते.