शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सावधान : तुमच्या बेडरूम मध्ये कोणीतरी डोकावतय !!!

By अनिल भापकर | Published: January 07, 2018 9:34 PM

आपल्यापैकी अनेकांना बेडरूम मध्ये लॅपटॉप वर काम करायची सवय असते. रात्री उशिरापर्यंत हि मंडळी आपले काम करत असतात . नंतर काम संपले कि लॅपटॉप आहे त्या स्थितीत बेडरूम मधील एखाद्या टेबल वर तसाच ठेऊन देतात आणि याच वेळी हजारो किलोमीटर दूर बसून तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या हॅकर्स चे फावते आणि तुमच्या बेडरूम मधील त्या क्षणाचे शूटिंग तुमच्याच लॅपटॉपच्या वेबकॅमच्या माध्यमातून ही मंडळी करतात आणि त्याचा गैरवापर करतात . असे अनेक प्रकार जगभरात उघडकीस आले आहेत.

ठळक मुद्देवेबकॅम हॅकर्स सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. हे लोक हजारो किलोमीटर अंतरावरुन तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वेबकॅम चालू-बंद करू शकतात. एवढेच नव्हे तर त्या वेबकॅमच्या हद्दीतील सगळी रेकॉर्डिंगही करू शकतात . हॅकर्स मॅलवेअरच्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपमध्ये प्रवेश करतात. तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपचे नियमित मॅलवेअर स्कॅनिंग करणं उत्तम. लॅपटॉप वेबकॅमला काम नसेल तेव्हा स्टीकर लावून झाकून ठेवणं उत्तम. वेबकॅमचा वापर करायचा तेव्हाच वेबकॅमचं स्टीकर काढायचं आणि काम झाले की परत स्टीकर लावून झाकून ठेवायचं.

आपल्यापैकी अनेकांना बेडरूम मध्ये लॅपटॉप वर काम करायची सवय असते. रात्री उशिरापर्यंत हि मंडळी आपले काम करत असतात . नंतर काम संपले कि लॅपटॉप आहे त्या स्थितीत बेडरूम मधील एखाद्या टेबल वर तसाच ठेऊन देतात आणि याच वेळी हजारो किलोमीटर दूर बसून तुमच्यावर लक्ष ठेवणाऱ्या हॅकर्स चे फावते आणि तुमच्या बेडरूम मधील त्या क्षणाचे शूटिंग तुमच्याच लॅपटॉपच्या वेबकॅमच्या माध्यमातून ही मंडळी करतात आणि त्याचा गैरवापर करतात . असे अनेक प्रकार जगभरात उघडकीस आले आहेत.

आपण ऑनलाईन सिक्युरिटी च्या बाबतीत अनेक गप्पा मारत असतो की मी अमुक काळजी घेतो तमुक काळजी घेतो . पण असं काही नाही तुमच्यावर अनेकांचा ऑनलाइन ‘वॉच’ असतो. तुमचे लोकेशन तर जवळपास सगळ्याच वेबसाइटवाल्यांकडे असते. विविध स्पायवेअर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काय काम करता यावर हॅकर्स लक्ष ठेवून असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे काही हजारो किलोमीटर अंतरावर बसून  हॅकर्स तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वेबकॅमही चालू बंद करू शकतात.हे सगळे ज्या प्रकारात घडते त्याला वेबकॅम हॅकिंग असे म्हणतात.

वेबकॅम हॅकर्स म्हणजे काय?

वेबकॅम हॅकर्स सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहेत. हे लोक हजारो किलोमीटर अंतरावरुन तुमच्या लॅपटॉप  किंवा डेस्कटॉपचा वेबकॅम चालू-बंद करू शकतात. एवढेच नव्हे तर त्या वेबकॅमच्या हद्दीतील सगळी रेकॉर्डिंगही करू शकतात . म्हणजे तुमचा लॅपटॉप तुमच्या बेडरूममध्ये टेबलावर पडलेला असेल आणि तो जर ओपन असेल आणि सुरु असेल तर तुमच्या बेडरूममधील सर्व हालचालीवर हे वेबकॅम हॅकर्स हजारो किलोमीटरवरून लक्ष ठेवू शकतात. असे काही भयंकर प्रकार डेस्कटॉप कॉम्प्युटरच्या वेबकॅमच्या बाबतीतही लक्षात आले आहेत.

हे वेबकॅम हॅकिंग करतात कसं?

वेबकॅम हॅकर्स हे नक्की करतात कसं ? आपल्यापैकी अनेकांनी फ्री सॉफ्टवेअर्स , गाणी, गेम्स असं काहीबाही डाउनलोड करायची भारी हौस असते. मात्र हे फ्री मिळणारे सॉफ्टवेअर्स आणि गाण्यांसोबत हे हॅकर्स मॅलवेअर प्रोग्राम्स देखील जोडून ठेवतात. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं फ्री सॉफ्टवेअर किंवा गाणं डाउनलोड करता तेव्हा हे मॅलवेअर प्रोग्राम्सदेखील त्या सोबत तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपवर डाउनलोड होऊन कार्यरत होतात. मॅलवेअर प्रोग्राम्स हा असा सॉफ्टवेअर प्रोग्राम असतो जो तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉप विषयीची सगळी माहिती जसे की आयपी अँड्रेस, हार्डवेअर डिटेल्स, ऑपरेटिंग सिस्टीम डिटेल्स आदिंबद्दल सर्व माहिती आपल्या मालकाकडे (हॅकर्सकडे) पाठविण्याचे काम इमानेइतबारे करत असतो. याच माहितीच्या आधारे वेबकॅम हॅकर्स तुमचा वेबकॅम हॅक करू शकतात.

वेबकॅम हॅकिंग कसे टाळाल ?

१) वेबकॅमचे फर्मवेअर अपडेट करा 

चांगल्या ब्रॅँडचा वेबकॅमला कंट्रोल करण्यासाठी स्वत:चे फर्मवेअर असते. ते फर्मवेअर वेबकॅम कंपन्याकडून वेळोवेळी अपडेट केले जाते . असे फर्मवेअर अपडेट उपलब्ध झाल्यास ते त्वरित अपडेट करावे म्हणजे वेबकॅममध्ये काही ‘बग’ असल्यास वेबकॅम कंपन्या नवीन फर्मवेअरच्या माध्यमातून तो बग काढण्याचा प्रयत्न करतात.

२) रूटीन मॅलवेअर स्कॅन :

हॅकर्स मॅलवेअरच्या माध्यमातून तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपमध्ये प्रवेश करतात. तुमच्या कॉम्प्युटर/लॅपटॉपचे नियमित मॅलवेअर स्कॅनिंग करणं उत्तम. त्यासाठी अनेक मॅलवेअर रिमूव्हल प्रोग्राम्स उपलब्ध आहेत.शिवाय तुमच्या लॅपटॉप वरील अँटीव्हायरस नेहमी अपडेट असले पाहिजे . 

३) वेबकॅम स्टीकर  :

शेवटचा आणि महत्वाचा मार्ग म्हणजे लॅपटॉप वेबकॅमला काम नसेल तेव्हा स्टीकर लावून झाकून ठेवणं उत्तम. वेबकॅमचा वापर करायचा तेव्हाच वेबकॅमचं स्टीकर काढायचं आणि काम झाले की परत स्टीकर लावून झाकून ठेवायचं. कॉम्प्युटर असेल तर त्याचा वेबकॅम काम नसेल तेव्हा बाजुला काढून ठेवणंही सोयीचं ठरावं.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानlaptopलॅपटॉप