शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंड अथवा मित्राचं Live Location बघायचंय?; 'ही' ट्रीक वापरा, पण त्याआधी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 15:28 IST

लोकेशन शेअरिंग पर्यायावर जावे लागेल. यानंतर तो तुमच्या ईमेल किंवा मेसेजद्वारे त्याचे लोकेशन शेअर करू शकतो.

अनेकदा आपल्याला मित्राचं किंवा गर्लफ्रेंडचं लोकेशन माहिती हवं असे वाटते. परंतु याबाबत सहजासहजी माहिती मिळत नाही. परंतु अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही मित्रांचे लाईव्ह लोकेशन जाणून घेऊ शकता. चांगली बाब म्हणजे हे पॉप्युलर फिचर टेक कंपनी Google कडून उपलब्ध करून दिले आहे. 

मित्रांचे लाईव्ह लोकेशन पाहण्यासाठी त्याचा फोनचा मोबाईल डेटा किंवा वायफाय सुरू असणं गरजेचे आहे. त्याशिवाय जीपीएस ऑनही असायला हवं अन्यथा तुम्हाला लाईव्ह लोकेशन दिसणार नाही. हा, पण तुम्ही त्यांच्या परवानगीशिवाय असं करू नका. विना परवानगी जर तुम्ही असे केले तर त्यामुळे तुम्ही अडचणीत अडकू शकता. 

Google Map अथवा WhatsApp चा वापर करून तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअरिंग करू शकता. सुरक्षेच्या कारणास्तव याचा वापर केला जाऊ शकतो. सर्वात आधी तुम्ही त्या मित्राशी किंवा गर्लफ्रेंडसोबत बोला ज्याचं लाईव्ह लोकेशन तुम्हाला हवं आहे. Google Maps द्वारे लोकेशन शेअरिंग करण्यासाठी तुमच्या मित्राचा अ‍ॅप ओपन करावं लागेल आणि लोकेशन शेअरिंग पर्यायावर जावे लागेल. यानंतर तो तुमच्या ईमेल किंवा मेसेजद्वारे त्याचे लोकेशन शेअर करू शकतो.

व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातूनही लाईव्ह लोकेशन शेअर करता येऊ शकते. यासाठी तुमच्या मित्राला तुमच्यासोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉक्स उघडावा लागेल. यानंतर, फोटो, व्हिडिओ आणि इतर अनेक गोष्टी शेअर करण्याचा पर्याय असेल. यातून लोकेशनचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, लाइव्ह लोकेशन निवडून, तो त्याचे लाईव्ह लोकेशन तुमच्यासोबत शेअर करू शकतो. त्यासाठी एक वेळ मर्यादाही सिलेक्ट करावी लागेल. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर मित्राचे लाईव्ह लोकेशन दिसेल. तथापि, अनेकांना या फीचरबद्दल आधीच माहिती असेल, परंतु मित्राच्या परवानगीशिवाय असे करणे गुन्हा आहे, यामुळे, लोकेशन शेअर करण्यापूर्वी मित्राने हे सांगणे आवश्यक आहे. 

टॅग्स :googleगुगलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप