शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

Vi च्या ग्राहकांना मिळणार ‘या’ पोर्टलवरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य; सरकारी नोकरीची तयारी देखील Vi अ‍ॅपवर   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:34 IST

Vodafone Idea च्या नव्या Vi Jobs and Education फिचरच्या मदतीनं कंपनीचे ग्राहक नोकरी शोधू शकतील, तसेच नोकरीसाठी आवश्यक ती तयारी देखील करता येईल.  

एकीकडे अन्य टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या करमणुकीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्स सोबत भागेदारी करत आहेत. तर Vodafone Idea नं आपलं लक्ष तरुणाईकडे वळवलं आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं Vi Games फिचरच्या माध्यमातून ग्राहकांच्या फावल्या वेळेची सोय केली होती. आता कंपनी Vi Jobs and Education च्या माध्यमातून तरुणांना नोकरी शोधण्यात आणि सरकारी नोकरीची तयारी करण्यात मदत करणार आहे.  

Vi Jobs and Education हे फिचर कंपनीच्या Vi अ‍ॅपमध्ये उपलब्ध झालं आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी भारतातील त्या प्रीपेड ग्राहकांना लक्ष्य करत आहे जे नोकरी शोधत आहेत, चांगली नोकरी मिळावी यासाठी इंग्रजी सुधारत आहेत किंवा सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत आहेत. यासाठी कंपनीनं या क्षेत्रातील मोठ्या स्टार्टअप्स सोबत भागेदारी केली आहे.  

कंपनीनं देशातील सर्वात मोठ्या जॉब सर्च प्लॅटफॉर्म Apna सोबत भागेदारी केली आहे. युजर्सचं इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्लिश लर्निंग प्लॅटफॉर्म Enguru ची मदत घेण्यात आली आहे. तर Pariksha अ‍ॅपच्या माध्यमातून वोडाफोन आयडियाचे ग्राहक सरकारी नोकरीची तयारी करू शकतील. यांच्या सेवा काही दिवस मोफत देण्यात येतील आणि त्यानंतर देखील सवलतीच्या दरात सेवा मिळत राहतील.  

Enguru इंग्रजीवर प्रभुत्व मिळण्यासाठी मदत करेल. या अ‍ॅपची 14 दिवसाचं ट्रायल क्लास अनलिमिटेड एक्सपर्ट्ससह इंटरैक्टिव लाईव्ह क्लासेस ग्राहकांना मिळतील. त्यानंतर 15 ते 20 टक्के डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना 1500 रुपयांचा इंडस्ट्री स्पेसिफिक सेल्फ लर्निंग मॉड्यूल देखील दिला जाईल.  

सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी Pariksha ऍपचं एका महिन्याचं सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. ज्यात 150 पेक्षा जास्त परीक्षांसाठी अनलिमिटेड मॉक टेस्ट उपलब्ध असतील. महिनाभरानंतर फक्त 249 रुपये देऊन तयारी सुरु ठेवता येईल.  

जॉब सर्च प्लॅटफॉर्म Apna ची सेवा मात्र विनामूल्य वापरता येईल. या प्लॅटफॉर्मवर Vi च्या ग्राहकांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्यामुळे कंपन्यांना तुमचं प्रोफाइल दिसण्याची शक्यता दुप्पट होईल.  

टॅग्स :Vodafoneव्होडाफोनIdeaआयडियाtechnologyतंत्रज्ञान