8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 01:17 PM2021-12-01T13:17:14+5:302021-12-01T13:17:46+5:30

8GB RAM Vivo Y55 5G Phone: Vivo Y55 5G Phone लवकरच बाजारात येऊ शकतो, यात 8GB RAM, Android 12 आणि मीडियाटेकचा प्रोसेसर मिळणार आहे.

Vivo Y55 5G Phone with MediaTek Dimensity 700 SoC and 8GB RAM listed on Geekbench  | 8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच 

8GB RAM सह Vivo Y55 5G Phone वेबसाईटवर लिस्ट; मीडियाटेक प्रोसेसरसह होऊ शकतो लाँच 

Next

VIVO नं गेले कित्येक दिवस आपल्या ‘वाय’ सीरीजमध्ये अनेक स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या बजेट सेगमेंटमध्ये सादर केले आहेत. आता या सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन गिकबेंचवर दिसला आहे. विवो लवकरच Vivo Y55 5G Phone बाजारात सादर करू शकते. चला पाहूया या फोनचे लीक झालेले स्पेसिफिकेशन्स. 

Vivo Y55 5G Phone चे लीक स्पेसिफिकेशन्स  

विवो वाय55 5जी गिकबेंचवर Vivo V2127 या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे, अशी माहिती गिजमोचायनानं दिली आहे. या गीकबेंच लिस्टिंगवरून लवकरच Vivo Y55 5G फोन बाजारात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 30 नोव्हेंबरच्या या लिस्टिंगमधून या फोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा देखील झाला आहे. 

गिकबेंचवर या फोनचे बेंचमार्किंग स्कोर मिळाले आहेत, विवो वाय55 5जीला सिंगलकोर टेस्टमध्ये 430 आणि मल्टीकोर टेस्ट मध्ये 1438 स्कोर मिळाला आहे. Vivo Y55 5G फोन अँड्रॉइड 12 सह बाजारात येऊ शकतो. या फोनमध्ये 2.20गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर मिळेल. गिकबेंचवर मीडियाटेक चिपसेटचा उल्लेख आहे. हा डिमेनसिटी 700 चिपसेट असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच बेंचमार्किंग साईटवरून या विवो मोबाईलच्या 8 जीबी रॅमची माहिती मिळाली आहे.  

Web Title: Vivo Y55 5G Phone with MediaTek Dimensity 700 SoC and 8GB RAM listed on Geekbench 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app