नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

By सिद्धेश जाधव | Published: May 9, 2022 09:09 AM2022-05-09T09:09:59+5:302022-05-09T09:11:19+5:30

Vivo X80 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन कंपनीनं जागतिक बाजारात उतरवले आहेत. यातील नवीन Sony IMX866 कॅमेरा सेन्सर खासियत म्हणता येईल.  

Vivo X80 Series Launched Globally With Flagship Camera Processor And MediaTek Dimensity 9000 Chip   | नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

नव्या आणि शानदार सोनी कॅमेरा सेन्सरसह आला Vivo X80 स्मार्टफोन, वनप्लस-सॅमसंगला देणार दणका 

googlenewsNext

Vivo नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन फ्लॅगशिप सीरिज चीनमध्ये सादर केली होती. तसेच Vivo X80 सीरीज भारतात देखील 18 मेला लाँच होणार असं देखील कंपनीनं सांगितलं आहे. याचं एक पेज देखील वेबसाईटवर लिस्ट करण्यात आलं आहे. परंतु तत्पूर्वी अनेक इंडस्ट्री फर्स्ट फीचर्ससह Vivo X80 सिरजीचे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात उतरवण्यात आले आहेत. ही पहिली स्मार्टफोन लाइनअप आहे, जी कंपनीच्या Vivo V1+ इमेज प्रोसेसर, Sony IMX866 फ्लॅगशिप कॅमेरा सेन्सर, Samsung GNV सेन्सर आणि MediaTek Dimensity 9000 प्रोसेसरसह येते.  

Vivo X80 सीरीजची किंमत 

Vivo X80 सीरीजचे दोन मॉडेल 12GB RAM आणि 256GB स्टोरेजसह मलेशियात आले आहेत. Vivo X80 ची किंमत 3,499 RM आहे, जे जवळपास 61,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात. Vivo X80 Pro मात्र मलेशियात 4,999 RM मध्ये विकत घेता येईल, जे जवळपास 88,000 रुपये होतात.  

Vivo X80 चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X80 मध्ये 6.78-इंचाचा फुलएचडी+ कर्व E5 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 1000 निट्स पीक ब्राईटनेस आणि 100% DCI-P3 कलर गॅमुटला सपोर्ट करतो. हा डिवाइस MediaTek च्या फ्लॅगशिप Dimensity 9000 प्रोसेसरसह येतो. 

फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तर मागे ट्रिपल कॅमेरा सेन्सर मिळतो. ज्यात सोनीचा नवीन 50MP IMX866 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याची जबाबदारी पार पडतो. त्याचबरोबर 12MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 12MP ची टेलीफोटो लेन्स आहे. फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Vivo X80 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Vivo X80 Pro मध्ये देखील 6.78-इंचाचा डिस्प्ले 2K रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. तसेच हा HDR10+ ला आणि 1500 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करते. या मॉडेलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट मिळतो. यात 4700mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

कॅमेरा सेगमेंट देखील खास आहे. यात Vivo V1+ ISP आहे आणि त्याचबरोबर मुख्य कॅमेऱ्यासाठी 50MP चा Samsung GNV सेन्सर मिळतो. मागे एक 48MP ची Sony IMX598 अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 12MP Sony IMX663 टेलीफोटो लेन्स आणि 8MP पेरीस्कोप लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.  

Web Title: Vivo X80 Series Launched Globally With Flagship Camera Processor And MediaTek Dimensity 9000 Chip  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.