शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम 

By सिद्धेश जाधव | Updated: February 26, 2022 12:03 IST

Vivo X Note स्मार्टफोन फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 7 इंचाच्या डिस्प्लेसह लवकरच लाँच केला जाऊ शकतो. 

Vivo सध्या आपल्या सर्वात पावरफुल स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची तयारी करता आहे. याआधी कंपनी आपल्या विवो नेक्स सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत होती. परंतु यावर्षी कंपनी नवीन सीरिजची सुरुवात करू शकते. विवो आपला आगामी प्रीमियम स्मार्टफोन Vivo X Note  नावानं बाजारात सादर करू शकते.  

Vivo चा एक आगामी स्मार्टफोन चिनी सर्टिफिकेशन साईट 3C वर मॉडेल नंबर V2170A सह दिसला आहे. टिपस्टर WHY LAB नं दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन Vivo X Note नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. याआधी हा फोन Vivo NEX 5 नावानं पदार्पण करणार असल्याची बातमी आली होती. 3C लिस्टिंगमधून विवो स्मार्टफोनच्या 80W फास्ट चार्जिंगची माहिती मिळाली आहे.  

Vivo X Note चे लीक स्पेसिफिकेशन्स 

Vivo X Note स्मार्टफोनमध्ये 7-इंचाचा मोठा Samsung AMOLED E5 डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा एक कर्व एज पंच होल कटआउट असलेला पॅनल असेल. जो Quad HD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात येईल. रॅम आणि स्टोरेज देखील साजेशी असेल अशी अपेक्षा आहे.  

Vivo X Note स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50-मेगापिक्सल Samsung S5KGN1 सेन्सर मुख्य कॅमेऱ्याचे काम करेल. तर सोबत 48-मेगापिक्सलची Sony IMX598 लेन्स, 12-मेगापिक्सलचा Sony IMX663 सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा OV08A10 टेलीफोटो कॅमेरा 5x झूमसह मिळू शकतो. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. विवोचा हा आगामी फ्लॅगशिप फोन मार्चमध्ये जागतिक बाजारात येऊ शकतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड