Amazon Sale: AC, Cooler, फ्रिजच्या किंमती देखील देणार थंडावा; स्वस्तात करा उन्हाळ्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 06:53 PM2022-02-25T18:53:38+5:302022-02-25T18:53:57+5:30

Amazon च्या Summer Appliances Carnival 2022 सेलमध्ये AC, Refrigerators, Dishwashers आणि Chimneys सारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स स्वस्तात उपलब्ध झाले आहेत.  

Amazon summer appliances carnival 2022 huge discount on acs refrigerators coolers and more  | Amazon Sale: AC, Cooler, फ्रिजच्या किंमती देखील देणार थंडावा; स्वस्तात करा उन्हाळ्याची तयारी

Amazon Sale: AC, Cooler, फ्रिजच्या किंमती देखील देणार थंडावा; स्वस्तात करा उन्हाळ्याची तयारी

googlenewsNext

Amazon नं आजपासून एका नवीन सेलची सुरुवात केली आहे. या सेलमध्ये उन्हाळ्यासाठी आवश्यक असलेल्या घरगुती उपकरणांवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. 25 फेब्रुवारीपासून सुरु झालेला Summer Appliances Carnival 2022 सेल 28 फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे.  

Summer Appliances Carnival 2022 सेल 

25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान अ‍ॅमेझॉन वेबसाईटवर हा सेल सुरु राहील. यात एसी, फ्रिज आणि कूलर्स असे उन्हाळ्यात उपयोगी ठरणारी उपकरणं स्वस्तात मिळतील. तर मायक्रोवेव्ह अव्हन, किचन चिम्नी आणि डिशवॉशर सारखे इलेक्ट्रॉनिक्स देखील डिस्काउंटसह उपलब्ध होतील.  

ऑफर्स  

या सेलमध्ये 5 हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केल्यास दमदार बँक ऑफर्स मिळतील. तसेच यात स्प्लिट एसीची किंमत 22,499 रुपयांपासून सुरु होईल. कन्व्हर्टिबल एसी 33,490 रुपयांपासून उपलब्ध होतील. विशेष म्हणजे सेलमध्ये एलजी, सॅमसंग, लॉयड, ब्लू स्टार आणि पॅनासॉनिक सारख्या लोकप्रिय ब्रँड्सचा समावेश असेल. तुम्हाला 18 महिन्यांच्या मर्यादेपर्यंत नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल.  

अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये रेफ्रिजरेटर्सची किंमत 13,990 रुपयांपासून सुरु होईल. लोकप्रिय ब्रँड्सवर 24 महिने नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय मिळेल. जुना फ्रिज एक्सचेंज करून 12 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येईल. सेलमध्ये पंख्यांवर 30 टक्क्यांपर्यंत तर कूलर्सवर 40 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल.  

हे देखील वाचा:

Web Title: Amazon summer appliances carnival 2022 huge discount on acs refrigerators coolers and more 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.