कमी बजेटमध्ये चांगले फीचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी सुवर्णसंधी आहे. स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन विवो टी४ आर 5G भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना अनेक आकर्षित फीचर्स मिळत आहेत. शिवाय, विवो टी४ आर 5G हा भारतात उपलब्ध असलेला सर्वात पातळ क्वाड-कर्व्हड डिस्प्ले स्मार्टफोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे.
विवो टी४ आर 5G: डिस्प्लेअवघ्या १७,४९९ रुपये किंमतीपासून सुरू होणारा हा स्मार्टफोनमध्ये २३९२ × १०८० रिझोल्यूशनचा ६.७७-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी IP68 आणि IP69 रेटिंग दिले आहे.
विवो टी४ आर 5G: कॅमेराया फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्से आणि २ मेगापिक्सेलच्या लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा स्मार्टफोन फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.
विवो टी४ आर 5G: बॅटरीविवो टी४ आर 5G स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना दिर्घकाळ टिकणारी ५ हजार ७०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी ४४ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
विवो टी४ आर 5G: स्टोरेज आणि किंमत८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज: किंमत- १७ हजार ४९९ रुपये८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज: किंमत- १९ हजार ४९९ रुपये१२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज: किंमत- २१ हजार ४९९ रुपये