12GB रॅमसह लाँच होऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G; लाँचच्या तारखेचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: July 13, 2021 03:02 PM2021-07-13T15:02:58+5:302021-07-13T15:04:03+5:30

Vivo S10 Pro Specs Play Console: विवो S10 मध्ये MediaTek MT6891 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. हा डायमेनसिटी 1100 प्रोसेसर आहे ज्याला माली जी77 जीपीयूची जोड देण्यात येईल.

Vivo s10 and s10 pro specs spotted on google play console  | 12GB रॅमसह लाँच होऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G; लाँचच्या तारखेचा खुलासा 

12GB रॅमसह लाँच होऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G; लाँचच्या तारखेचा खुलासा 

Next

विवो 15 जुलैला चीनमध्ये Vivo S10 सीरीजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच करणार आहे. हे स्मार्टफोन्स Vivo S10 आणि Vivo S10 Pro 5G नावाने सादर केले जाऊ शकतात. काही दिवसांपूर्वी TENAA आणि Geekbench वर दिसलेली ही स्मार्टफोन सीरिज आता Google Play Console वर दिसली आहे. या लिस्टिंगमध्ये Vivo S10-सीरीज फोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती समोर आली आहे.  (Vivo S10 Pro Specifications Google Play Console V2121a Dimensity 1100 SOC Android 11 12GB RAM)

लिस्टिंगनुसार, विवो S10 मध्ये MediaTek MT6891 SoC सह 12GB पर्यंतचा रॅम दिला जाऊ शकतो. हा डायमेनसिटी 1100 प्रोसेसर आहे ज्याला माली जी77 जीपीयूची जोड देण्यात येईल. या स्मार्टफोनमधील स्क्रीन साईजची माहिती मिळाली नाही परंतु या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आणि 480 पीपीआय पिक्सल डेंसिटी असेल. या फोनमध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल, अशी चर्चा आहे.  

Vivo S10 आणि Vivo S10 Pro चे स्पेसिफिकेशन 

काही दिवसांपूर्वी एक फोन टेनावर मॉडेल नंबर V2121A सह लिस्ट करण्यात आला होता. हा फोन Vivo S10 सीरीजचा भाग असू शकतो, अशी चर्चा आहे. हा फोन Vivo S10 आहे कि Vivo S10 Pro हे अजून स्पष्ट झालेले नाही. लिस्टिंगनुसार, हा फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर केला जाईल. या फोनमध्ये 6.4-इंचाच्या डिस्प्लेसह 3,970mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.  

या सीरीजमध्ये Vivo S10 आणि Vivo S10 Pro स्मार्टफोन लाँच केले जाऊ शकतात. विवोच्या टीजर ईमेजमधून एस10 सीरीजमधील 108मेगापिक्सल कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे. अजून एका रिपोर्टनुसार, फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असू शकतो. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो, यात 44 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 3,970mAh ची बॅटरी 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. 

Web Title: Vivo s10 and s10 pro specs spotted on google play console 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.