शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

‘सेक्सटॉर्शन’चे बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 09:37 IST

ॲड. प्रशांत माळी, सायबर कायदे तज्ज्ञ म्ही इंटरनेट सर्फिंग काळजीपूर्वक केले नाही तर तुम्ही नव्या युगातील गुन्ह्यांचे बळी होऊ शकता. ...

ॲड. प्रशांत माळी, सायबर कायदे तज्ज्ञ

म्ही इंटरनेट सर्फिंग काळजीपूर्वक केले नाही तर तुम्ही नव्या युगातील गुन्ह्यांचे बळी होऊ शकता. याला सेक्सटॉर्शनचा बळी होणे म्हणतात. सायबर ठगांनी विणलेले हे जाळे आहे. ज्यामध्ये लोक स्वत:च कष्टाचे पैसे देतात किंवा आपल्या अब्रूचे धिंडवडे काढतात. ‘सेक्स्टॉर्शन’ म्हणजे ‘लैंगिक खंडणी’ ज्याला सुसंस्कृत शब्द म्हणजे ‘सेक्सटॉर्शन’. हा एक प्रकारचा ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे, ज्यामध्ये गुन्हेगार लैंगिक अनुकूलता, पैसे किंवा इतर फायद्यांची मागणी करणे, जिव्हाळ्याचा किंवा लैंगिकदृष्ट्या सुस्पष्ट सामग्री जाहीर करण्याची धमकी देतो. ‘सेक्स्टॉर्शन’ हा गुन्हा करण्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

आपल्या सौंदर्याचा व खासगी भागाचा वापर करून मोठ्या लोकांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडायचे व त्या माध्यमाद्वारे नंतर त्यांच्याकडून खंडणी वसूल करायची व त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवायची, हा एक मोठा व्यवसाय झालेला आहे. हा गुन्हा करण्यासाठी सोशल मीडिया, मेसेजिंग ॲप्स आणि ऑनलाइन डेटिंगच्या लोकप्रियतेसह ऑनलाइन सुस्पष्ट सामग्रीची देवाण-घेवाण केली जाते. वेबकॅमद्वारे रेकॉर्ड करणे खूप सोपे झाले आहे. एकटे राहणारे तरुण, व्यावसायिक, राजकारणी, प्रतिष्ठित व्यक्तींवर सोशल मीडियाच्या डीपीला महिलांचे फोटो ठेवून जाळे फेकले जाते. आपण वरकरणी तंत्रयुगात वावरत असतो, तरी त्याच्या जोडीला एक भ्रमयुगही आहे, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.

राजकारणी मंडळी टार्गेटवर

साधारणत: कॉलेजच्या मुलांसोबत हा गुन्हा मोठ्या प्रमाणात घडताना दिसतो. त्याचा परिणाम म्हणजे तरुण पिढी डिप्रेशनसारख्या रोगाला बळी पडू लागली आहे. 

तरुण पिढी इंटरनेटच्या आहारी जाऊन ‘सेक्सटॉर्शन’सारख्या प्रकारांमुळे जीवन संपवत आहे. राजकारणी मंडळीही या गुन्ह्यांचे बळी ठरतात. त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय जीवनावर होतो. त्यासोबतच वैयक्तिक आयुष्यातदेखील कौटुंबिक तणाव निर्माण होतात. 

देशाची गोपनीय माहिती मिळवतात...

‘सेक्स्टॉर्शन’चा वापर करून लष्करातील गोपनीय माहितीही हस्तगत करण्याचा सापळा रचल्याचे आपल्या वाचनात आले असेल; पण देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला लक्ष्य करून परकीय शक्ती कशाप्रकारे हातपाय पसरू शकतात, याचा अनुभव शास्त्रज्ञाच्या घटनेवरून मिळाल्याने ‘सेक्स्टॉर्शन’चा धोका आणखीनच वाढला आहे.सेक्सटॉर्शनच्या साहाय्याने गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविली जाऊ शकते, ही अतिशय गंभीर बाब आहे.

जाळ्यात कसे ओढतात?

सुरुवातीला तुम्हाला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती स्वीकारल्यानंतर तुमच्या सोबत व्हाॅट्सॲपवर चॅटची सुरुवात होते. त्याद्वारे आवडनिवड जाणून घेतली जाते. 

ओळख वाढल्यानंतर हा संवाद वैयक्तिक आणि लैंगिक पातळीवरचा होतो. त्यातून अश्लील छायाचित्रे आणि व्हिडीओ प्रसारित केले जातात. 

त्यांनतर एक व्हिडीओ कॉल येतो, ज्यामध्ये एखादी महिला आक्षेपार्ह स्थितीत असेल. त्यानंतर समोरील व्यक्ती कॉल डिस्कनेक्ट करण्याचा विचार करणार तोवर स्क्रीन रेकॉर्डिंग करून स्कॅमर व्हिडीओ बनवतात आणि नंतर संबंधितांना व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल केले जाते.

हे लक्षात ठेवा

इंटरनेट कधीही कोणतीही माहिती विसरत नाही किंवा माफ करत नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट एकदा शेअर केली असेल, तर ती नेटवर कायमस्वरूपी, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात राहते. अशा प्रकारांना बळी न पडता तसेच न घाबरता आणि संकोच न बाळगता जर तुम्ही ‘सेक्स्टॉर्शन’च्या जाळ्यात अडकले असाल तर यासंदर्भातील तक्रार वेळीच पोलिसांकडे करा.

अनोळखी व्यक्तींची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. इंटरनेटची पोहोच आणि वेग प्रचंड आहे. अल्पावधीत, आक्षेपार्ह सामग्री लाखो लोकांपर्यंत पसरू शकते.

कोणत्याही परिस्थितीत, सार्वजनिक डोमेनमध्ये माहिती लीक झाल्यास, नंतरच्या टप्प्यावर हानी किंवा लाजिरवाणी गोष्ट घडू शकते. तेव्हा कोणतीही माहिती पोस्ट, सामायिक, प्रसारित, रेकॉर्ड करण्यापूर्वी विचार करा.

ऑनलाइन संवाद किंवा चॅटदरम्यान जर समोरची व्यक्ती घाईघाईने विविध गोष्टींमधून जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती धोक्याची घंटा आहे.

समाजमाध्यमातील कोणत्याही संवादाला बळी न पडणे. मोबाइलवरील अपरिचित कॉल आणि संदेशांना उत्तर देणे टाळावे.