शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:24 IST

Mobile SIM Card Rule: येत्या शुक्रवार म्हणजे 7 जानेवारीपासून देशातील अनेक सिमकार्ड बंद होणार आहेत. हा नियम गेल्यावर्षी 7 डिसेंबर 2021 रोजी लागू करण्यात आला होता.

Mobile SIM Card Rule: दूरसंचार विभाग (DoT) नं गेल्या महिन्यात 7 डिसेंबर 2021 रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार, 9 पेक्षा जास्त सिमकार्ड धारकांना सिमकार्ड व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य असेल. असं न केल्यास तुमचं सिमकार्ड बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या व्हेरिफिकेशनसाठी DoT कडून 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती, जी 6 जानेवारी 2022 ला संपत आहे.  

जर तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त सिम रजिस्टर्ड असतील तर तुम्हाला 7 जानेवारीआधी सिम कार्डचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. युजरकडे अतिरिक्त सिमकार्ड सरेंडर करण्याचा देखील पर्याय असेल. युजरला व्हेरिफिकेशनचं नोटिफिकेशन येईल. जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्या सिमची आउटगोइंग बंद केली जाऊ शकते. तसेच 45 दिवसांच्या आत इनकमिंग कॉल्सची सेवा देखील बंद केली जाईल.  

नोटिफिफाय केलेला सिम व्हेरिफाय न झाल्यास तो 60 दिवसांच्या आत बंद केला जाईल. तसेच इंटरनॅशनल रोमिंग, आजारी आणि दिव्यांग व्यक्तींना व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवस अतिरिक्त देण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर आणि उत्तर पूर्वेकडील राज्यांतील नागरिकांना जास्तीत जास्त 6 सिम बाळगण्याची मुभा आहे. तर उर्वरित भारतात जास्तीत जास्त 9 सिम वापरता येतील.  

तुमच्या नावावर किती सिम आहेत ते असे बघा

  • सर्वप्रथम tafcop.dgtelecom.gov.in वर जा.
  •  इथे तुमचा मोबाईल नंबर सबमिट करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून नंबर व्हेरिफाय करा.
  • व्हेरिफिकेशननंतर सर्व मोबाईल नंबरची लिस्ट येईल, जे तुमच्या आयडीवर नोंदवलेले आहेत.
  • जर तुम्ही वापरत नसलेला एखादा चालू नंबर असेल तर तुम्ही त्या नंबरची तक्रार याच पोर्टलवर करू शकता.
  • जर नंबर तुमच्या ओळखपत्रावर असेल आणि तुम्ही वापरत नसाल तर तो ब्लॉक केला जाईल.

हे देखील वाचा:

थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट

सॉलिड टॅबलेट! 7770mAh Battery, 11 इंचाचा मोठा डिस्प्ले; Motorola Moto Tab G70 आला फ्लिपकार्टवर

टॅग्स :technologyतंत्रज्ञान