तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड?

By सिद्धेश जाधव | Published: July 17, 2021 07:14 PM2021-07-17T19:14:49+5:302021-07-17T19:17:56+5:30

Useful Android Secret Codes: अँड्रॉइड सिक्रेट कोड्सच्या मदतीने फोनच्या मेमोरी, रॅम, कॅमेरा तसेच लायसन्स, सॉफ्टवेयरची माहिती बघता येते.  

Useful Android mobile secret codes  | तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड?

तुम्हाला माहित आहेत का 'हे' Android स्मार्टफोनचे सिक्रेट कोड?

Next

तुमच्या पैकी अनेकजण अनेक वर्ष अँड्रॉइड फोन वापरत असतील. अँड्रॉइडच्या काही ट्रिक्स देखील तुम्हाला माहित असतील परंतु तुम्हाला माहित आहे का अँड्रॉइड मोबाईल वापरून तुम्ही फोनची सिक्रेट माहिती मिळवण्यासाठी अनेक सिक्रेट कोड्स आहेत. या कोड्सना USSD (Unstructured Supplementary Service Data) असे म्हटले जाते. वेगवेगळ्या माहितीसाठी वेगवेगळे USSD कोड्स आहेत. पुढे आम्ही अश्याच काही काही सिक्रेट USSD कोड्सची माहिती दिली आहे. पुढे दिलेले कोड्स एखादा मोबाईल नंबर डायल करतो त्याप्रमाणे आपल्या फोनमध्ये डायल करायचे आहेत. तुम्ही कोड डायल केला कि त्वरित फोनची माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसू लागेल. 

सिक्रेट अँड्रॉइड कोड्स 

*#*#4636#*#* : हा कोड डायल केल्यावर तुम्हाला तुमच्या फोनची संपूर्ण माहिती मिळेल. यात बॅटरी, मोबाईल नेटवर्क, वाय-फाय, अ‍ॅप युजेजसह बरीच माहिती मिळेल. 

*#06#: हा कोड डायल करून तुम्ही तुमच्या फोनचा आयएमआय नंबर चेक करू शकता. IMEI नंबरसह फोनचा MEID नंबर पण हा सिक्रेट कोड डायल केल्या नंतर मिळू शकतो.  

*#07#: जर तुम्हाला तुमच्या फोनची सार व्हॅल्यू जाणून घ्यायची असेल तर तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरून *#07# डायल करा. हा नंबर डायल केल्यानंतर फोनची SAR Value फोनच्या डिस्प्लेवर येईल.  

कंपन्यांचे सिक्रेट सिक्रेट कोड 

*#0*#: हा सॅमसंगचा सिक्रेट कोड आहे, ज्याचा वापर सॅमसंगच्या फोनमध्ये हार्डवेयरची माहिती मिळवण्यासाठी केला जातो.  

*#0228#: हा कोड देखील सॅमसंगच्या फोन्सवरच चालतो. तुमच्या सॅमसंग फोनवर हा नंबर डायल केल्यावर तुम्हाला फोनमधील डिस्प्ले आणि बॅटरीचे स्टेटस समजेल. 

*#*#64663#*#*: हा कोड शाओमी युजर्स वापरू शकतात. हा कोड डायल केल्यावर हार्डवेयरची माहिती डिस्प्लेवर येईल.  

*#800#: हा कोड रियलमी फोन्ससाठी आहे. हा कोड डायल केल्यावर रियलमी युजर्स फॅक्ट्री मोड आणि फीडबॅक मेन्यू ओपन करू शकतील.  

Web Title: Useful Android mobile secret codes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.