भारतीय स्मार्टफोन कंपनी लावा आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Lava Agni 4 भारतात लाँच करण्याची तयारी करत आहे. हा ५जी हँडसेट २० नोव्हेंबरला बाजारात दाखल होत आहे. मात्र, लाँचिंगपूर्वीच कंपनीने एक जबरदस्त आणि अनोखी ऑफर आणली आहे. ग्राहकांना फोन खरेदी करण्यापूर्वी तो घरी वापरून पाहता येणार आहे.
लावाने या खास मोहिमेला 'Demo@Home' असे नाव दिले आहे. याअंतर्गत मुंबई, दिल्ली आणि बेंगळूरु येथील ग्राहक नोंदणी करून फोन घरी मागवू शकतील आणि खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी Agni 4 चा डिझाइन आणि फीचर्स तपासू शकतील.
फीचर्स आणि अपेक्षित किंमतLava Agni 4 मध्ये प्रीमियम सेगमेंटमधील अनेक वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. यात MediaTek चा पॉवरफुल Dimensity 8350 चिपसेट दिला जाऊ शकतो, जो वेगवान ५जी कनेक्टिव्हिटी आणि उत्कृष्ट गेमिंग अनुभव देईल. फोनमध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले असेल, जो 120Hz रिफ्रेश रेट सह येणार आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत कंपनीने मोठा अपग्रेड केला आहे. यात 50MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.
हँडसेटमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी आणि 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. तसेच जलद LPDDR5X रॅम, UFS 4.0 स्टोरेज आणि 'नो-ब्लोटवेअर'चा अनुभव मिळेल. Lava Agni 4 ची किंमत ₹25,000 ते ₹30,000 च्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
Web Summary : Lava is launching its Agni 4 smartphone with a unique 'Demo@Home' offer. Customers can try the phone before buying in select cities. The Agni 4 boasts a Dimensity 8350 chipset, 6.67-inch AMOLED display, 50MP dual cameras, and 66W fast charging, priced between ₹25,000-₹30,000.
Web Summary : Lava Agni 4 स्मार्टफोन को 'Demo@Home' ऑफर के साथ लॉन्च कर रहा है। ग्राहक चुनिंदा शहरों में खरीदने से पहले फोन का इस्तेमाल कर सकते हैं। Agni 4 में Dimensity 8350 चिपसेट, 6.67-इंच AMOLED डिस्प्ले, 50MP डुअल कैमरे और 66W फास्ट चार्जिंग है, जिसकी कीमत ₹25,000-₹30,000 के बीच है।