Oppo लाँच करू शकते दमदार गेमिंग स्मार्टफोन; आसूस-लेनोव्हाला देणार टक्कर
By सिद्धेश जाधव | Updated: July 7, 2021 17:10 IST2021-07-07T17:06:08+5:302021-07-07T17:10:01+5:30
Oppo Gaming Smartphone: Oppo चा आगामी गेमिंग स्मार्टफोन युरोपियन युनियन इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) च्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या पेटंटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.

Oppo लाँच करू शकते दमदार गेमिंग स्मार्टफोन; आसूस-लेनोव्हाला देणार टक्कर
मोबाईल गेमिंगचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. स्वस्त डेटा, कमी किंमतीत दमदार कामगिरी करणारे स्मार्टफोन्स अशी अनेक कारणे मोबाईल गेमिंगच्या उदयाला कारणीभूत आहेत. या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या खास गेमिंग स्मार्टफोन लाँच करत आहेत. ASUS, Xiaomi, Realme, आणि Lenovo या कंपन्यांनी गेमिंग स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता OPPO देखील गेमिंग स्मार्टफोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. लेटेस्ट लीक रिपोर्टमध्ये दावा केला गेला कि ओप्पो लवकरच गेमिंग स्मार्टफोन लाँच करू शकते. कंपनीने अधिकृतपणे या फोनची माहिती दिली नाही, परंतु 91Mobiles ने ओप्पो गेमिंग स्मार्टफोनच्या डिजाईन माहिती दिली आहे.
OPPO च्या गेमिंग फोनची डिजाइन
Oppo चा आगामी गेमिंग स्मार्टफोन युरोपियन युनियन इंटेलेक्चुल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) च्या वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. या पेटंटच्या माध्यमातून या स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. हा स्मार्टफोन कोणत्या नावाने लाँच केला जाईल किंवा याचा मॉडेल नंबर किती असेल याची कोणतीही माहिती अजूनतरी मिळाली नाही. या लिस्टिंगमध्ये ओप्पोच्या या स्मार्टफोनची डिजाईन समोर आली आहे. ओप्पोच्या आगामी गेमिंग फोनची डिजाइन ASUS ROG Phone 5 आणि Lenovo Legion 2 Pro सारखी वाटत आहे.
समोर आलेल्या फोटोवरून, Oppo च्या गेमिंग फोनमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी नॉचच्या ऐवजी जाड बेजल देण्यात येईल. या बेजलमध्ये फ्रंट कॅमेरा आणि इतर सेन्सर असू शकतात. या OPPO गेमिंग फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह मिळू शकतो. तसेच या फोनच्या बॅक पॅनलवर अनोखी डिजाइन असेल.