कितीही काही झालं तरी फुटणार नाही हा दणकट Smartphone; कमी किंमतीत जोरदार परफॉर्मन्स 

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2022 12:54 PM2022-06-21T12:54:35+5:302022-06-21T12:55:04+5:30

UMIDIGI Bison 2 आणि UMIDIGI Bison 2 Pro असे दोन Rugged Smartphone सादर करण्यात आले आहेत.  

Umidigi bison 2 rugged smartphone series now available with 48mp camera 6150mah battery   | कितीही काही झालं तरी फुटणार नाही हा दणकट Smartphone; कमी किंमतीत जोरदार परफॉर्मन्स 

कितीही काही झालं तरी फुटणार नाही हा दणकट Smartphone; कमी किंमतीत जोरदार परफॉर्मन्स 

Next

UMIDIGI आपली नवीन स्मार्टफोन सिरीज BISON 2 सादर केली आहे. या सीरिजमध्ये UMIDIGI Bison 2 आणि UMIDIGI Bison 2 Pro हे दोन रगड स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. हे फोन्स कमी किंमतीत दणकट बॉडीसह सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे उंचावरून पडून देखील फोन्स सुखरूप राहतात आणि पाण्यात देखील हे व्यवस्थित चालतात, असा दावा कंपनीनं केला आहे.  

स्पेसिफिकेशन्स 

दोन्ही स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो P20 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर चालतात. UMIDIGI BISON 2 मध्ये 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. तर BISON 2 PRO स्मार्टफोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हे फोन्स अँड्रॉइड 12 ओएसवर चालतात. यात 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 

BISON 2 सीरीजमध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 16MP अल्ट्रा-वाईड अँगल आणि 5MP मॅक्रो सेन्सरसह AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 24MP चा सेन्सर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन 6150mAh च्या मोठ्या बॅटरीसह बाजारात आले आहेत. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

मजबुती सिद्ध करण्यासाठी फोन्स IP68/69K आणि MIL-STD-810G सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आले आहेत. हे वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि शॉकप्रूफ डिवाइस आहेत. तसेच मल्टीफंक्शनल एनएफसी, वायरलेस एफएम, इजेक्टर-फ्री सिम कार्ड ट्रे, पावर बटन एम्बेड फिंगरप्रिंट सेन्सर, टाइप-सी पोर्ट इत्यादी फीचर्स देखील मिळतात.  

UMIDIGI BISON 2 सीरिजची किंमत  

UMIDIGI BISON 2 चे दोन्ही फोन्स 27 जूनपासून अली एक्सप्रेसवरून ऑर्डर करता येतील. यातील UMIDIGI BISON 2 या बेस मॉडेलची किंमत 169.99 डॉलर (13,247 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर प्रो मॉडेलसाठी 199.99 डॉलर (15,585 रुपये) मोजावे लागतील.   

Web Title: Umidigi bison 2 rugged smartphone series now available with 48mp camera 6150mah battery  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.