शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

टायपिंगच्या आवाजाने चोरी होईल पासवर्ड; AI चा वापर करून हॅकिंगची 'ही' धोकादायक पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:17 IST

टायपिंगच्या आवाजावरून सिस्टम हॅक केली जात असल्याचं उघड झालं आहे. याआधी हॅकिंगच्या या पद्धतीबद्दल ऐकलं नसेल, पण असं होऊ शकतं.

हॅकर्सपासून वाचण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी हॅकर्स पुन्हा नवनवीन मार्ग शोधतात. असाच एक धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. टायपिंगच्या आवाजावरून सिस्टम हॅक केली जात असल्याचं उघड झालं आहे. याआधी हॅकिंगच्या या पद्धतीबद्दल ऐकलं नसेल, पण असं होऊ शकतं. एका नव्या रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे.

तुमच्या कॉम्प्युटरवर किंवा लॅपटॉपवर पासवर्ड टाइप करताना तुम्ही स्क्रीन आणि कीबोर्ड कोणी पाहू नये म्हणून दुसऱ्यांपासून वाचवू शकता, पण आवाजाचं काय? ZDnet च्या रिपोर्टनुसार, हॅकर्स एका खास तंत्रज्ञानाचा वापर करून कीबोर्डच्या आवाजाने तुमचा पासवर्ड क्रॅक करू शकतात.

हॅकिंगचा नवा मार्ग काय आहे?

आपला पासवर्ड कोणीतरी गुपचूप पाहेल याची आपल्याला अनेकदा काळजी वाटते, पण पासवर्ड ऐकण्याकडे आपलं लक्ष कधीच जात नाही. हॅकिंगच्या या पद्धतीला  Acoustic Side-Channel Attack म्हणतात. पासवर्ड हॅकिंगच्या या प्रकारात तुमच्या कीबोर्डमधून बाहेर पडणाऱ्या आवाजावर लक्ष केंद्रित केलं जातं.

हॅकर्स आवाजाचे विश्लेषण करून तुमच्या सिस्टमचा पासवर्ड क्रॅक करतात. यासाठी त्यांना एक प्रगत साधन वापरावे लागेल, जे तुम्ही टाइप केलेली नेमकी अक्षरे आणि अंकांची माहिती देते. हा धोका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांच्या टीमने प्रयोग केला. त्यांनी MacBook Pro 16-इंचाचा वापर केला, जो एक शक्तिशाली लॅपटॉप आहे. 

आयफोन 13 मिनी लॅपटॉपपासून त्यांनी काही अंतरावर एका मऊ कापडावर ठेवला, जेणेकरून आवाज पकडता येईल. याशिवाय लॅपटॉपचे रेकॉर्डिंग फंक्शनही वापरलं. यानंतर, हा सर्व डेटा एआय आधारित स्मार्ट कॉम्पुटर प्रोग्राम शिकवण्यासाठी वापरला गेला, ज्याचे काम टायपिंग आवाजांचे निरीक्षण करणे आहे.

ही पद्धत 95% पर्यंत कार्य करते

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या एआय प्रोग्रामची चाचणी घेण्यात आली आहे. चाचणीमध्ये, हा प्रोग्राम कोणत्या बटणाचा आवाज आहे हे अगदी सहजपणे शोधतो. अहवालानुसार, ते 95 टक्क्यांपर्यंत अचूक प्रिडिक्ट करतो.

संशोधकांनी हे टाळण्याचा मार्गही शोधून काढला आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संशोधकांना असे आढळून आले आहे की आपण या प्रोग्रामची सहज फसवणूक करू शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या टायपिंगमध्ये बदल करावा लागेल. शिफ्टचा वापर करून टाइप करू शकता, यामुळे प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही व्हिडीओ कॉलवर असल्यास, तुम्ही पार्श्वभूमी आवाज जोडू शकता, जेणेकरून AI टूल तुमचा टायपिंग आवाज योग्यरित्या डीकोड करू शकणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानcyber crimeसायबर क्राइम