Google अकॉउंट लॉगिन करण्याची बदलणार पद्धत; आत्ताच अ‍ॅक्टिव्हेट करा Two-Step Verification 

By सिद्धेश जाधव | Published: November 4, 2021 06:09 PM2021-11-04T18:09:54+5:302021-11-04T18:10:04+5:30

Two-Step Verification For Google Account: यावर्षी मेमध्ये Google ने 150 million युजर्स आणि 2 million युट्युब क्रिएटर्सच्या अकॉउंटची सुरक्षा वाढण्यासाठी Two-Step Verification वर एनरॉल करण्याचा निर्णय घेतला होता.  

Two step verfication to be mandatory for google account login from november 9 know how to enable  | Google अकॉउंट लॉगिन करण्याची बदलणार पद्धत; आत्ताच अ‍ॅक्टिव्हेट करा Two-Step Verification 

Google अकॉउंट लॉगिन करण्याची बदलणार पद्धत; आत्ताच अ‍ॅक्टिव्हेट करा Two-Step Verification 

Next

गुगल या वर्षाच्या अखेरपर्यंत 15 कोटीपेक्षा जास्त युजर्सची अकॉउंटमध्ये लॉगिन करण्याची पद्धत बदलणार आहे. टेक दिग्गज कंपनीने Two-Step Verification पद्धत बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 9 नोव्हेंबरपासून Google अकॉउंट वापरण्यासाठी युजरना टू स्टेप व्हेरिफिकेशन अ‍ॅक्टिव्हेट करावे लागेल. यामुळे या अकॉउंट्सना सुरक्षेचा अजून एक लेयर मिळेल.  

या नव्या सुरक्षेमुळे लॉगिन करण्यासाठी अकॉउंट पासवर्ड टाकल्यावर अजून एक ऑथेंटिकेशन कोड सबमिट करावा लागेल. हा कोड युजरच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून पाठवण्यात येईल.   

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमधून या बदलाची माहिती दिली आहे. कंपनीने 2021 च्या अखेरपर्यंत 15 कोटी गुगल युजरच्या अकॉउंट मध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑटो एनरॉल करणार असल्याचे सांगितले आहे. तसेचज दोन दशलक्ष Youtube क्रिएटर्सना देखील हे फीचर ऑन करावे लागेल. अकॉउंटच्या सुरक्षेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सर्वात विश्वासू पद्धत असल्याचे गुगलने सांगितले आहे. याची सुरुवात कंपनीने यावर्षी मे मधेच केली आहे.   

Two-Step Verification म्हणजे काय?  

2SV मध्ये अकॉउंटमध्ये लॉगिन करण्यासाठी दोन फॅक्टर्सची गरज असते. यातील पहिला फॅक्टर म्हणजे तुमचा पासवर्ड असतो. तर दुसरा फॅक्टर तुमच्या स्मार्टफोन किंवा ईमेलवर येणारा वन टाइम पासवर्ड असेल. यामुळे जरी तुमचा पासवर्ड कोणाच्या हाती लागला तरी तुमच्या अकॉउंटमध्ये लॉगिन करणे जमणार नाही. तुम्ही तुमच्या गुगल अकॉउंट सेटिंगमध्ये जाऊन हे फिचर ऑन करू शकता.  

रिपोर्ट्सनुसार गुगल ईमेल आणि इन-अ‍ॅप नोटीफाकेशनमधून युजर्सना हे फिचर एनेबल करण्यास सांगितले आहे. या मेसेजनुसार जर वेरीफिकेशन प्रोसेस 9 नोव्हेंबर पर्यंत अ‍ॅक्टिव्हेट केली गेली नाही तर ती आपोआप एनेबल करण्यात येईल.  

Two-Step Verification कसे एनेबल करायचे  

  • तुमचे Google Account ओपन करा  
  • डावीकडे असलेल्या नेव्हिगेशन पॅनलमध्ये ‘security’ ची निवड करा  
  • त्यानंतर Signing in to Google ऑप्शनच्या खाली असलेलं 2-Step Verification ऑन करा  
  • आता समोर येणाऱ्या स्टेप्स फोल्लो करा.  

Web Title: Two step verfication to be mandatory for google account login from november 9 know how to enable 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.