सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

By सिद्धेश जाधव | Published: August 26, 2021 05:57 PM2021-08-26T17:57:39+5:302021-08-26T17:57:47+5:30

Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अ‍ॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अ‍ॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो.  

Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data   | सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

googlenewsNext

सध्याच्या डिजिटल युगात जोपर्यंत पूर्णपणे माहिती नसेल तोपर्यंत शॉर्टकट्स आणि ट्रिक्स वापरूच नये. काही लोक लोकप्रिय इन्स्टंट मेसेंजर WhatsApp ला खूप गांभीर्याने घेतात. त्यावर लोकांचे लपलेले लास्ट सीन, ब्लु टिक्स, आणि डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी अनेक ट्रिक्स करतात. यासाठी बऱ्याचदा मॉडिफाइड म्हणजे मॉड अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स मूळ अ‍ॅपचे मॉडिफाइड व्हर्जन्स असतात, ज्यांची निर्मिती थर्ड-पार्टी डेव्हलपर्सने केलेली असते. यात तुम्हाला काही अतिरिक्त फीचर्स मिळतात, परंतु त्यासाठी प्रायव्हसी आणि सुरक्षेशी तडजोड करावी लागते. अश्याच एका अ‍ॅप FMWhatsApp ची माहिती समोर आली आहे, जो तुमची खाजगी माहिती चोरू शकतो.  

सायबर सिक्यॉरिटी फर्म Kaspersky ने एका नव्या WhatsApp मॉड अ‍ॅपची माहिती दिली आहे, ज्याचे नाव FMWhatsApp आहे. हा फेक व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅप युजर्सच्या डिवाइसमध्ये मालवेयर पोहोचवण्याचे काम करतो. या मालवेयरचे नाव Triada Trojan असे आहे जो डिवाइसवरून डेटा चोरी करतो. या अ‍ॅपमध्ये मालवेयरयुक्त जाहिराती चालवल्या जातात आणि यातील काही जाहिराती युजरच्या नकळत बॅकग्राऊंडमध्ये सुरु असतात. FMWhatsApp अ‍ॅप इन्स्टॉलेशनच्या वेळी एसएमएस वाचण्याची परवानगी देखील मागतो.  

SMS वाचण्याच्या परवानगीचा फायदा घेऊन या अ‍ॅप द्वारे अनेक पेड सर्व्हिसेसचे सब्स्क्रिप्शन युजरच्या नकळत घेतले जाते. तसेच इन्स्टॉलेशनच्या वेळी मिळलेल्या परवानग्या वापरून हा अ‍ॅप युजरची खाजगी माहिती देखील चोरू शकतो. आकर्षक अतिरिक्त फीचर्स मिळावे म्हणून बऱ्याचदा युजर्स हे थर्ड पार्टी अ‍ॅप्स डाउनलोड करतात. परंतु हेच शॉर्टकट्स आणि ट्रिक्स त्यांना महागात पडू शकतात.  

अ‍ॅप्स डाउनलोड करताना कोणती काळजी घ्यावी  

क्लोन अ‍ॅप्सपासून सावधान, हे अ‍ॅप्स मूळ अ‍ॅप प्रमाणे दिसतात परंतु घातक असतात. सध्या Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर अश्या अ‍ॅप्सचा भरणा आहे. जे तुमचा स्मार्टफोन स्लो करू शकतात आणि तुमचा खाजगी डेटा चोरू शकतात. त्यामुळे Google Play आणि Apple App Store वर उपलब्ध असलेले अ‍ॅप्सच डाउनलोड करा आणि डाउनलोड करताना त्या अ‍ॅप्सचे रिव्यू वाचा, किती लोकांनी डाउनलोड केले आहे ते बघा आणि मगच इंस्टॉल करा, असा सल्ला सिक्योरिटी फर्म Kaspersky ने दिला आहे.  

Web Title: Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.