शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

ग्राहकांना 28 नाही तर 30 दिवसांच्या वैधतेचा प्री-पेड रिचार्ज प्लॅन द्या, TRAI चा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:49 AM

Telecom Tariff 66th Amendment Order 2022: TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील.

नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे. TRAI ने अलीकडेच टेलिकॉम टॅरिफ (66 वी सुधारणा) आदेश जारी केला आहे. यानुसार टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्संना (टीएसपी) 28 दिवसांऐवजी 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन जारी करण्याचे आदेश दिले आहेत. TRAI च्या नवीन आदेशानुसार, टेलिकॉम कंपन्यांना अधिसूचना जारी केल्यापासून 60 दिवसांच्या आत 30 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करावे लागतील.

TRAI च्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केले पाहिजे, ज्याची वैधता 28 दिवसांऐवजी 30 दिवस आहे. जर ग्राहकाला या प्लॅन्सचे पुन्हा रिचार्ज करायचे असेल तर ते सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून ते करू शकतात, अशी तरतूद असावी.

दरम्यान, टेलिकॉम कंपन्या महिनाभर पूर्ण रिचार्ज देत नसल्याची तक्रार युजर्सनी अलीकडेच केली होती. टेलिकॉम कंपन्या महिन्यातील 30 दिवसांऐवजी 28 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन ऑफर करत आहेत, त्यानंतर TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कमी दिवसांची वैधता देण्याचा आरोपरिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या खाजगी टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावावर ग्राहकांना 30 ऐवजी 28 दिवसांची वैधता देतात, अशी तक्रार होती. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, दर महिन्याला 2 दिवस वजा करून, कंपन्या वर्षातील जवळपास 28 दिवसांची बचत करतात. अशा प्रकारे, टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना वर्षात 12 ऐवजी 13 महिन्यांसाठी रिचार्ज करायला लावतात. याचप्रमाणे, दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 54 किंवा 56 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. तर तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये 90 दिवसांऐवजी 84 दिवसांची वैधता दिली जाते.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायMobileमोबाइलIdeaआयडियाVodafoneव्होडाफोनJioजिओAirtelएअरटेल