Tokyo Olympics 2020: सोने-चांदीपासून नव्हे तर या गोष्टीपासून बनलेत पदकं; वाचून व्हाल हैराण
By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 12:58 IST2021-07-31T18:28:53+5:302021-08-04T12:58:00+5:30
Tokyo Olympics Medals: Tokyo Olympics मध्ये मिळणार मेडल बनलेले रिसायकल इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपासून बनले आहेत.

Tokyo 2020 Medal Project मध्ये जापानच्या 1,621 नगर पालिकांनी मिळून जवळपास 78,985 टन सामान जमा केलं.
सध्या जपानमध्ये टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळ सुरु आहेत. यात भारतासह जगभरातील अनेक देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. दर चार वर्षांनी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाते आणि यात वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. परंतु तुम्हाला माहित आहे का टोकियो ऑलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेली पदकं खूप खास आहेत. ही पदकं सोने, चांदी आणि ब्रॉन्झ धातूपासून बनवली जातात हे तुम्हाला माहित असेल. परंतु यावेळी टोकियो ऑलिम्पिकमधील पदकं जुन्या इलेक्ट्रॉनिक्सना रिसायकल करून बनवण्यात आले आहेत.
Tokyo Olympic च्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच ऑलिम्पिकमधील विजेत्यांना मिळणारी पदकं शुद्ध सोने, चांदी किंवा ब्रॉन्जपासून नव्हे तर जुन्या इलेक्ट्रॉनिक्सपासून बनवण्यात आली आहेत. या रिसायकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप इत्यादींचा समावेश आहे. विशेष म्हणजे जपानमध्ये ही पदकं बनवण्याच्या कामाला 2017 पासून सुरुवात झाली होती.
Tokyo 2020 Medal Project मध्ये जापानच्या 1,621 नगर पालिकांनी मिळून जवळपास 78,985 टन सामान जमा केलं. यात मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश होता. यात जपानमधील NTT Docomo रिटेल स्टोर्सने देखील मदत केली. यातून 32 किलोग्राम सोनं, 4,100 किलोग्राम चांदी आणि 2,700 किलोग्राम ब्रॉन्झ काढण्यात आलं. हे धातू विरघळवून जवळपास 5,000 सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकं बनवण्यात आली आहेत.