पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:24+5:302015-03-14T23:45:24+5:30

पुणे : पुढील २४ तासात शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज पुण्यात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे पाऊस पडेल, अशी स्थिती होती. मात्र प्रत्यक्षात शहरात दुपारी पावसाचे काही थेंबच पडले.

Thunderstorms with thunderstorms in Pune | पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

णे : पुढील २४ तासात शहराच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. दरम्यान, आज पुण्यात दिवसभर ढगाळ हवामान होते. त्यामुळे पाऊस पडेल, अशी स्थिती होती. मात्र प्रत्यक्षात शहरात दुपारी पावसाचे काही थेंबच पडले.
शहरात ढगाळ हवामान असले तरी तापमानातील वाढ कायम होती. कमाल तापमान ३३.३ अंश तर किमान तापमान १७.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. उपनगरांमध्येही अशीच स्थिती होती. लोहगाव येथे ३३.१ अंश आणि १९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे दिवसा पुणेकरांना उकाडा जाणवत होता. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्रीचा हवेतील गारवा गायब झाला आहे.

Web Title: Thunderstorms with thunderstorms in Pune