Thomson ची नवीन 4K Smart TV रेंज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: October 6, 2021 03:38 PM2021-10-06T15:38:01+5:302021-10-06T15:38:16+5:30

Android Smart TV Thomson PATH 4K Smart TV: Thomson India ने भारतात आपली नवीन Path Series (9R PRO) स्मार्ट टीव्ही रेंज अंतर्गत तीन नवीन मॉडेल्स सादर केले आहेत.

thomson launched new android 4k smart tv series in india  | Thomson ची नवीन 4K Smart TV रेंज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Thomson ची नवीन 4K Smart TV रेंज भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स 

Next

Thomson India ने भारतात आपली नवीन Path Series (9R PRO) अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही रेंज लाँच केली आहे. कंपनीने या रेंजमध्ये तीन मॉडेल्स सादर केले आहेत, यात 43-इंच, 50-इंच आणि 55-इंचाच्या मॉडेल्सचा समावेश आहे. Thomson चे नवीन हे स्मार्ट टीव्ही ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येतील. हे तिन्ही मॉडेल मेड इन इंडिया आहेत, असे कंपनीने सांगितले आहे.  

Thomson PATH 4K Smart TV ची किंमत 

Thomson PATH 4K Smart TV च्या 43 इंचाचा मॉडेल कंपनीने 23,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. तर 50 इंचाचा मॉडेलसाठी कंपनीने 31,999 रुपये किंमत ठेवली आहे. या रेंजमधील सर्वात मोठा 55-इंचाचा मॉडेल 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. थॉमसन के तिन्ही स्मार्ट टीव्ही मेड इन इंडिया आहेत. 

Thomson PATH 4K Smart TV Range फीचर्स आणि स्पेसीफिकेशन्स  

Thomson PATH TV रेंजमधील तिन्ही मॉडेल अल्ट्रा हाय डेफिनेशन व्हिडीओ HDR10+ ला सपोर्ट करतात. यात 40W साउंड आउट असेलेले स्पीकर देण्यात आले आहेत. कंपनीने यात Amlogic प्रोसेसरचा वापर केला आहे, ज्याचा स्पीड 1.4 GHz आहे. या नवीन Thomson स्मार्ट टीव्ही ANDROID TV ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात.

कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्युअल बँड Wi-Fi सपोर्ट मिळतो. त्याचबरोब इन-बिल्ट Chromecast आणि Airplay  देखील आहे. हे स्मार्ट टीव्ही गुगल असिस्टंटच्या मदतीने कंट्रोल देखील करता येतात. स्मार्ट टीव्ही सोबत येणाऱ्या रिमोटमध्ये Google Assistant शॉर्टकट बटणसह YouTube, Amazon Prime Video आणि Sony Liv साठी हॉट की देण्यात आल्या आहेत. 

Web Title: thomson launched new android 4k smart tv series in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.