शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

सावधान! Paytm, GPay, Bhim App चा वापर करता?; 'ही' चूक टाळा, अन्यथा व्हाल कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 11:00 IST

Paytm, GPay, Bhim App : डिजिटल पेमेंट पद्धती वाढत असताना सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, फसवणूक करणारे तुमचे पैसे चोरण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात

नवी दिल्ली - हल्ली प्रत्येक जण ऑनलाईन व्यवहारांना जास्त महत्त्व देतं. कमी वेळेत यामुळे व्यवहार करणं सोपं असतं. अगदी बिल भरण्यापासून ते तिकीट बुक करण्यापर्यंत, आजच्या जगात आपण सर्व साधारणपणे UPI अ‍ॅप, नेट बँकिंग वापरतो. किराणा दुकान असो, भाजीपाल्याची गाडी असो किंवा शॉपिंग मॉल, ऑनलाइन पेमेंटची सुविधा आता सर्वत्र उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या पद्धतींद्वारे आपण पैसे ट्रान्सफर करू शकतो किंवा मिळवू शकतो. ऑनलाईन पेमेंटमुळे आर्थिक व्यवहार करणं खूप सोप्पे झालं आहे. शिवाय यात वेळेची बचत देखील होते. 

एकीकडे डिजिटल पेमेंट पद्धती वाढत असताना सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महत्वाचे म्हणजे, फसवणूक करणारे तुमचे पैसे चोरण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतात. भारतात गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. तुम्ही कोणतेही डिजिटल पेमेंट अ‍ॅप वापरत असाल (मग Google Pay असो किंवा PhonePe किंवा Paytm), तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे. असं केल्यास होणारी फसवणूक टाळता येईल आणि सुरक्षित पेमेंट देखील करता येईल. 

तुमचे UPI अ‍ॅप अपडेट ठेवा: 

सायबर गुन्हेगारांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे UPI अ‍ॅप वेळोवेळी अपडेट करत राहा. सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी, कंपन्या प्रत्येक अपडेटसह नवीन वैशिष्ट्ये प्रदान करतात. अशा परिस्थितीत UPI अ‍ॅप नेहमी अपडेट ठेवा. 

पेमेंट प्राप्त करण्यासाठी कधीही पिन टाकू नका

कोणत्याही UPI अ‍ॅपमध्ये, पैसे मिळवण्यासाठी युजरला त्याचा/तिचा पिन प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे, पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा.

फ्रॉड कॉलपासून सावध राहा

सायबर गुन्हेगार लोकांना फक्त लिंक पाठवून पैसे चोरण्याचा प्रयत्न करत नाहीत तर, ते युजर्सना थेट कॉल करून त्यांचा पासवर्ड, पिन इत्यादी विचारतात. बँका कॉलवर असे डिटेल्स विचारत नाहीत. त्यामुळे अशा कोणत्याही कॉलला तुम्ही बळी पडू नका. 

कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका आणि पिन टाकू नका

आजकाल लोकांना Mail आणि WhatsApp वर विशेषत: सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला 'गिफ्ट' किंवा 'कॅशबॅक' प्राप्त करण्यासाठी तुमचा पिन आणि इतर तपशील प्रविष्ट करण्यास सांगतात. त्यामुळे अशा लिंक्सची काळजी घ्या आणि त्यावर क्लिक करू नका.

स्ट्राँग पासवर्ड सेट करा

यूपीआय सर्व्हिससाठी रजिस्ट्रेशन करतानाच एक स्ट्राँग पासवर्ड सेट करा. कोणालाही कळणार नाही असा पिन सेट करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतटचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :MONEYपैसाfraudधोकेबाजी