शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

व्हॉट्सअॅप आणतंय हे दोन जबरदस्त फिचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 07:53 IST

आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे.

नवी दिल्ली - आपल्या युजर्ससाठी नेहमी नवनवे फिचर्स आणणा-या लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरु असताना वॉईस कॉल की व्हिडिओ कॉल असा पर्याय उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या फिचरमध्ये व्हाट्सअॅप व्हाईस कॉल रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे. हे दोन्ही फिचर्स अॅंड्रॉईडवरच लागू होणार आहेत. व्हॉट्सअॅप सध्या दोन नव्या फिचर्ससाठी काम करीत आहे. सध्या व्हॉट्सअॅपकडून या नव्या फीचरची चाचपणी सुरु असून अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर तपासलं जात आहे. लवकरच हे फीचर तुमच्या-आमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. येत्या वर्षाच्या सुरुवातीला हे फीचर लाँच होण्याचा अंदाज आहे.

चाचणी सुरूWABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओ-व्हॉईस कॉल संदर्भात व्हॉट्सअॅप टीमची सध्या चाचपणी सुरू आहे. सुरु असलेला कॉल बंद न करता त्याला व्हिडिओ कॉलमध्ये रुपांतरीत करता येणार आहे. जुलै महिन्यात यासंबधी प्रथम चाचणी करण्यात आली होती. या फिचरची चाचणी झाली असून याचा वापर कसा करायचा यासंबधी स्क्रीनशॉटही पाठविण्यात येणार आहेत.

तरच व्हिडिओ कॉल कॉल उचलल्यास व्हॉइस कॉल हा अचानक व्हिडिओ कॉलमध्ये स्विच करणार नाही. समोरच्या व्यक्तीला यासंबंधी गेलेली रिक्वेस्ट एक्सेप्ट झाल्यानंतरच व्हिडिओ कॉल सुरू होऊ शकेल. 

रेकॉर्ड व्हॉईस कॉल व्हॉईस मेसेजसाठी व्हॉट्सअॅप एक नवे फिचर आणत आहे. फोन कॉल सुरु असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन युजरसमोर येईल. कॉल वर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यातून युजरला करता येणार आहे. त्यामूळे रेकॉर्ड झालेला वॉईस कॉल नंतरही ऐकता येणार आहे. 

WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते.  मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील. 

‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर...व्हॉट्सअॅपच्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या नव्या फीचरची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आले आहे. या फीचरमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येतो. तुम्ही पाठविलेला मेसेज जर डिलिट करायचा असेल तर त्या मेसेजवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर तो मेसेज फक्त तुमच्या फोनमधून म्हणजेच तुमच्या पुरता डिलिट होईल. कॅन्सल निवडले तर मेसेज डिलिट होणार नाही. पण जर डिलिट फॉर एव्हरिवन हा पर्याय निवडला तर तो मेसेज तुमच्या तसेच रिसिव्हरच्या चॅट बॉक्समधून डिलिट होईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप