शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

हे 10 अॅप तुमचा स्मार्टफोन करतात हॅंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 11:02 IST

अशा प्रकारचे कोणते अॅप आहेत जे आपला स्मार्टफोन हॅंग करण्यास किंवा बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरतात? हे माहित असायला हवे. म्हणूनच जाणून घ्या…

स्मार्टफोन हॅंग करण्यासाठी किंवा त्याची बॅटरी लवकर संपविण्यासाठी काही अॅप कारणीभूत ठरतात. स्मार्टफोनमधील प्लेस्टोअर वरून विवीध अॅप डाऊनलोड करणे आपल्याला नेहमीच आवडते. त्यापैकी अनेक अॅप हे एकतर गेम अॅप असतात किंवा सोशल मीडिया, तसेच ऑनलाईन सेवा पुरवणारी असतात. आपण डोऊनलोड केलेल्या अनेक अॅपपैकी बरेच अॅप अत्यंत हेवी असतात. तसेच स्मार्टफोनच्या स्पीडवरही परिणाम करणारी असतात. म्हणूनच अशा प्रकारचे कोणते अॅप आहेत जे आपला स्मार्टफोन हॅंग करण्यास किंवा बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरतात? हे माहित असायला हवे. म्हणूनच जाणून घ्या…

Candy Crush Saga

कॅंडी क्रश सागा हे एक गेमिंग अॅप आहे. तरूणाईसोबतच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकही मोठ्या प्रमाणात या अॅपची बळी ठरली आहेत. क्लासरूम, घर, ट्रेनप्रवास इतकेच नव्हे तर जागा मिळेल तेथे अनेक मंडळी Candy Crush Saga वर गेम खेळण्यात मग्न असतात. पण, तुम्हाला माहिती आहे का हे अॅप तुमच्या फोनच्या बॅटरीवर तर परिणाम करतंच. पण, तुमच्या फोनची स्पेसही खूप खातं. त्यामुळे तुमच्या फोनचा डेटा उगाच वाया जातो.

Pet Rescue Saga

हे अॅपही वाटते तितके साधे नाही. या अॅपमुळेही तुमच्या मोबाईलची बॅटरी, स्टोरेज  आणि डेटा मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. याचा परिणाम मोबाईलच्या कार्यप्रणालीवर होऊन त्याचा वेग मंदावतो.

Clash of Clans

केवळ टाईमपास आणि मनोरंजन म्हणून डाऊनलोड केलेले हे अॅप खूप बॅटरी खाते. तसेच, सतत बॅटरी खान्यामुळे तुम्हाला मोबाईल चार्जीगसाठी सतत चार्जर सोबत ठेवण्यास हे अॅप प्रवृत्त करतं.

Google Play Services

प्ले स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोडचे  प्रमाण मोठे आहे. हे अॅपही तुमच्या मोबाईलची बॅटरी, स्टोरेज आणि डेटा खाते. एव्हीजीनेही याबाबत दुजोरा दिला आहे.

OLX

हे एक ऑनलाईन सेवा देणारे अॅप आहे. पण, तुम्ही या अॅपच्या प्रेमात असाल तर, मोबाईलची बॅटरी, डेटा आणि स्टोरेज खर्च करण्यात तयार रहा.

Facebook

सोशल मीडियात क्रमांक एकवर असलेलेल हे अॅप तरूणाईच्या गळ्यातील ताईत आहे. जगभरात कोणत्याच सोशल साईटकडे नसतील इतके यूजर्स हे अॅप यूज करतात.

WhatsApp

जास्त स्पेस खाणाऱ्या अॅपच्या यादीत व्हाट्सअॅपचे नाव पाहून कदाचीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण, हे खरे आहे. स्मार्टफोन वापरतोय पण व्हाट्सअॅप वापरत नाही. फेसबुक प्रमाणेच हे अॅपही जास्त डेटा, स्टोरेज आणि मोबाईलची बॅटरी खाते.

Lookout Security & Antivirus

आपला स्मार्टफोन हॅंग होतोय म्हणजे त्याला व्हायरस लागला आहे, असा बहुदा अनेकांचा गैरसमज असतो. पण, तो खरा असतोच असे नाही. स्मार्टफोन हॅंग व्हायला केवळ व्हायरसच कारणीभूत असत नाही. तर, मोबाईलमध्ये असणारी अॅपही कारणीभूत असतात. त्यामुळे तुम्ही जर Lookout Security & Antivirus हे अॅप डाऊनलोड केले असेल तर त्यामुळेही मोबाईलचा डेटा आणि बॅटरी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो.

Android weather & clock widget

हे अॅपही मोबाईलचा डेटा, स्टोरेज आणि बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरते.

 Solitaire

 हे एक गेमिंग अॅप असून, तुमच्या मोबाईलची बॅटरी खाण्यास कारणीभूत ठरते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया