शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 15:51 IST

Elon musk Starlink Project: एक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करणारी सॅटेलाईट सेवा आहे. याद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरविली जातेय. टेस्लाच्या कार या संपूर्णपणे या सेवेवरच अवलंबून असतात. यामुळे स्टारलिंक भारतात आणावीच लागणार आहे.

भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीवर गेल्या तीन-चार वर्षांपासून अब्जाधीश मुकेश अंबानींच्या Reliance Jio ने अक्षरश: राज्य केले आहे. आता या जिओला जगातील सर्वात मोठा अब्जाधीश नेस्तनाभूत करण्यासाठी येत आहे. या अब्जाधीशाचे नाव आहे एलन मस्क (Elon Musk). टेस्ला कारच्या एन्ट्रीनंतर मस्क यांची स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉरपोरेशन (SpaceX) स्टारलिंक प्रोजेक्ट भारतात आणणार आहे. यानंतर भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठा भूकंप होणार आहे. (According to the plans of SpaceX, Elon Musk is planning to enter the ever-growing Indian telecommunications industry with 100-Mbps satellite-based internet.)

SpaceX भारतात सुरुवातीच्या काळात 100 Mbps सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सर्व्हिस देणार आहे. या तयारीनिशी कंपनी भारतात उतरण्याची शक्यता आहे. 1 ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ असलेल्या भारत आणि चीनसारख्या देशांमध्ये मस्क आपल्या कंपनीचा विस्तार करणार आहेत. Analyticsindiamag वेबसाइट नुसार भारत सरकारकडे मस्क यांच्या कंपनीने सॅटेलाईट बेस्ड ब्रॉडबँड टेक्नॉलॉजीची सेवा देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ट्रायने गेल्या वर्षी एक प्रस्ताव पाठविला होता. याला स्पेस एक्सने उत्तर पाठविले आहे. यामध्ये SpaceX ची विंग सॅटेलाईट गव्हर्नमेंट अफेअर्सने हाय स्पीड सॅटेलाईट नेटवर्क भारतात सर्व लोकांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटीने जोडण्याच्या लक्ष्यामध्ये मदत करू शकते, असे म्हटले आहे. भारत इंटरनेट युजरचे मोठी बाजारपेठ आहे. येथे 70 कोटी इंटरनेट ग्राहक आहेत. यांची संख्या 2025 पर्यंत वाढून 97.4 कोटी होण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात इंटरनेट स्पीड 12 Mbps आहे. 5जी आल्यानंतर भारतातील इंटरनेटचा वेग वाढणार आहे. मात्र, गाव आणि दुर्गम भागात इंटरनेट पोहोचविण्यास वेळ लागणार आहे. हेच काम SpaceX च्या स्टारलिंक प्रोजेक्टने आरामात केले जाऊ शकते. कारण थेट सॅटेलाईटवरून या भागात इंटरनेट सेवा पुरविता येणार आहे. याचसोबत ही सेवा कमी किंमतीतही उपलब्ध होणार आहे. फायबर ऑप्टिक केबल टाकण्यास हजारो कोटी लागणार आहेत. त्यापेक्षा वायरलेस असलेल्या सॅटेलाईट सेवेद्वारे खर्चही कमी येणार आहे. 

काय आहे स्टारलिंकStarlink एक पृथ्वीच्या खालच्या कक्षेत भ्रमण करणारी सॅटेलाईट सेवा आहे. याद्वारे ब्रॉडबँड सेवा पुरविली जातेय. टेस्लाच्या कार या संपूर्णपणे या सेवेवरच अवलंबून असतात. यामुळे स्टारलिंक भारतात आणावीच लागणार आहे. स्पेस एक्स ही मस्क यांची खासगी अंतराळ कंपनी आहे, जी भारताच्या इस्त्रो सारखेच अंतराळात सॅटेलाईट पाठविण्याचे काम करते. स्पेसएक्स 2027 पर्यंत अंतराळात 12000 सॅटेलाईट पाठविण्याची तयारी करत आहे. याचबरोबर जमिनीवरही या सॅटेलाईटचे स्टेशन तयार करणार आहे. SpaceX नुसार त्यांचा इंटरनेट स्पीड हा 50Mbps ते 150Mbps एवढा असणार आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओTeslaटेस्लाInternetइंटरनेटMukesh Ambaniमुकेश अंबानी