शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दमदार बॅटरी आणि जबरदस्त कॅमेऱ्यासह Tecno Spark 7 लाँच; जाणून घ्या किंमत अन् स्पेसिफिकेशन्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 16:11 IST

Tecno Spark 7 With Dual Rear Cameras, Selfie Flash Launched in India : टेक्‍नोच्‍या स्‍मार्टफोन्‍सची लोकप्रिय स्‍पार्क श्रेणी किफायतशीर दरातील विभागामध्‍ये दर्जात्‍मक डिझाइन, डिस्‍प्‍ले, कॅमेरा आणि सर्वांगीण स्‍मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते.

नवी दिल्‍ली - टेक्‍नो या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांच्‍या स्‍पार्क सिरीजमधील आणखी एक सेगमेंट-फर्स्‍ट वैशिष्‍ट्यांनी युक्‍त फ्यूचर-रेडी डिवाईस स्‍पार्क ७ (Tecno Spark 7) च्‍या लाँचची घोषणा केली आहे. या नवीन स्‍मार्टफोनसह टेक्‍नोने भारतातील ५ हजार – १० हजार स्‍मार्टफोन विभागातील अव्‍वल ५ हँडसेट कंपन्‍यांमधील त्‍यांचे स्‍थान अधिक प्रबळ करण्‍याचे कार्य सुरूच ठेवले आहे. स्‍पार्क ७ स्‍मार्टफोन २ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटसाठी ६,९९९ रूपये आणि ३ जीबी + ६४ जीबी व्‍हेरिएंटसाठी ७,९९९ रूपये या सुरुवातीच्या विशेष ऑफर किंमतीसह उपलब्‍ध आहे. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून स्‍प्रूस ग्रीन, मॅग्‍नेट ब्‍लॅक आणि मॉर्फअस ब्‍ल्‍यू या ३ आकर्षक रंगांमध्‍ये एमेझॉनवर उत्पादनाची विक्री सुरू होईल. 

टेक्‍नोच्‍या स्‍मार्टफोन्‍सची लोकप्रिय स्‍पार्क श्रेणी किफायतशीर दरातील विभागामध्‍ये दर्जात्‍मक डिझाइन, डिस्‍प्‍ले, कॅमेरा आणि सर्वांगीण स्‍मार्टफोन अनुभवासाठी ओळखली जाते. अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. मोठ्या क्षमतेची ६००० एमएएच बॅटरीसह एआय पॉवर चार्जिंग व सुरक्षित चार्जिंग, विशाल ६.५२ इंच डॉट-नॉच डिस्‍प्‍ले आणि उच्‍च दर्जाचा १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा आहे. तसेच या स्‍मार्टफोनमध्‍ये टाइम लॅप्‍स वैशिष्‍ट्यासह विविध रेकॉर्डिंग सेटिंग्‍ज, व्हिडिओ बोकेह आणि स्‍लो-मो व्हिडिओ हे फीचर्स आहेत. 

ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''आमच्‍या 'इंडिया-फर्स्‍ट' धोरणाशी बांधील राहत टेक्‍नो आकर्षक दरांमध्‍ये विभागातील सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांनी युक्‍त वाजवी व मध्‍यम-दरातील स्‍मार्टफोन्‍स विभागामध्‍ये धुमाकूळ निर्माण करण्‍यासाठी 'मेड फॉर इंडिया' स्‍मार्टफोन्‍सवर फोकस देण्‍याचे कार्य सुरूच ठेवेल. हीच बाब लक्षात घेत स्‍पार्क ७ आमचा ग्राहकवर्ग वाढवण्‍यामध्‍ये आम्‍हाला साह्य करेल. आम्‍हाला विश्‍वास आहे की, स्‍पार्क ७ स्‍मार्टफोन्‍सच्‍या नवीन श्रेणीसह आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांचे प्रेम व पाठिंबा मिळत राहील. काऊंटरपॉइण्‍ट अहवालाच्‍या मते, गेल्‍या वर्षी स्‍मार्टफोन्सची 'स्‍पार्क' सिरीज सादर केल्‍यानंतर टेक्‍नो ५,००० रूपये ते १०,००० रूपये विभागामधील प्रख्‍यात 'टॉप ५ स्‍मार्टफोन ब्रॅण्‍ड्स' क्‍लबमध्‍ये प्रवेश केला आहे. २०२१ मध्‍ये आम्ही ग्राहकांना आकर्षक दरांमध्‍ये व्‍यापक श्रेणी देत ५-१५ हजार स्‍मार्टफोन्‍स विभागामध्‍ये पोर्टफोलिओ निर्माण करण्‍यासाठी आमची उपस्थिती अधिक दृढ करण्‍याचा प्रयत्‍न करू.''  

स्‍पार्क ७ (३ जीबी + ६४ जीबी)

उच्‍च दर्जाच्या १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह स्‍लो–मो आणि टाइप लॅप्‍स व्हिडिओ वैशिष्‍ट्ये. स्‍पार्क ७ मध्‍ये १६ मेगापिक्‍सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह क्‍वॉड फ्लॅश आहे. मुख्‍य कॅमे-यामध्‍ये एफ/१.८ अर्पेचर आहे, ज्‍यामुळे अधिक सुस्‍पष्‍टपणे फोटोज कॅप्‍चर करता येतात. टाइम-लॅप्‍स व्हिडिओज, स्‍लो मोशन व्हिडिओज, बोकेह मोड, एआय ब्‍युटी मोड आणि एआय पोर्ट्रेट मोड यासारखी प्रिमिअम वैशिष्‍ट्ये असलेला स्‍पार्क ७ सुधारित स्‍मार्टफोन फोटोग्राफी अनुभव देतो. ८ मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरासह एफ२.० अर्पेचर आणि ड्युअल फ्रण्‍ट फ्लॅशसह अॅडजस्‍टेबल ब्राइटनेस सेल्‍फीप्रेमींचे लक्ष वेधून घेतात. 

दीर्घकाळापर्यंत टिकणारी ६००० एमएएच बॅटरी

स्‍पार्क ७ मध्‍ये मोठ्या क्षमतेच्या ६००० एमएएच बॅटरीसह सेफ चार्ज वैशिष्‍ट्य आहे. ही बॅटरी जवळपास ४१ दिवसांचा प्रचंड स्‍टॅण्‍डबाय टाइम, ४२ तासांचा कॉलिंग टाइम, १७ तासांचे वेब ब्राऊजिंग, ४५ तासांचे म्‍युझिक प्‍लेबॅक, १७ तासांचे गेम प्‍लेइंग आणि २७ तासांचा व्हिडिओ प्‍लेबॅक देते. मोठ्या क्षमतेची बॅटरी एआय पॉवर सेव्हिंग, फुल चार्ज अलर्ट सारख्‍या इतर एआय वैशिष्‍ट्यांसह येते आणि ओव्‍हरचार्जिंग टाळण्‍यासाठी फोन पूर्ण चार्ज होताच आपोआपपणे वीजपुरवठा बंद करते. 

मोठे डिस्‍प्‍ले, अधिक मनोरंजन 

६.५२ इंची एचडी+ डॉट नॉच डिस्‍प्‍लेसह ७२० x १६०० रिझॉल्‍युशनमधून परिपूर्ण सिने‍मॅटिक व्‍युइंग अनुभव मिळतो. ९०.३४ टक्‍के बॉडी स्क्रिन रेशिओ आणि २०:९ एस्‍पेक्‍ट रेशिओसह ४८० नीट्स ब्राइटनेस व्‍यापक सर्वोत्तम व्‍युइंग अनुभव देते.

सुलभ मल्‍टीटास्किंगसह व्‍यापक स्‍टोरेज क्षमता

स्‍पार्क ७ मध्‍ये ३ जीबी रॅमसह ६४ जीबी इंटर्नल स्‍टोरेज आहे, जे २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ज्‍यामुळे स्‍मार्टफोनमध्‍ये सुलभपणे व कोणत्‍याही त्रासाशिवाय तुमची सर्व माहिती स्‍टोअर करता येते. स्‍पार्क ७ अँड्रॉइड ११ वर आधारित आधुनिक एचआयओएस ७.५ वर कार्यसंचालित आहे आणि एकसंधी, विनाव्‍यत्‍यय स्‍मार्टफोन अनुभवासाठी शक्तिशाली ऑक्‍टा-कोअर १.८ गिगाहर्ट्झ सीपीयू हेलिओ ए२५ प्रोसेसरने समर्थित आहे.

सुरक्षितता

स्‍पार्क ७ मध्‍ये इन-बिल्‍ट फेस अनलॉक २.० आणि स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर आहे, जो युजरचा डेटा व गोपनीयतेचे संरक्षण करतो. फेस अनलॉक २.० फोन दुस-याकडून सुरू करण्‍यापासून संरक्षण करते आणि सूर्यप्रकाशामध्‍ये डिस्‍प्‍ले सुस्‍पष्‍टपणे दिसण्‍याची खात्री देते. स्‍मार्ट फिंगरप्रिंट सेन्‍सर फोनला फक्‍त ०.२ सेकंदांमध्‍ये अनलॉक करते आणि कॉल्‍स स्‍वीकारण्‍यामध्‍ये, फोटो काढण्‍यामध्‍ये व अलार्म्‍स बंद करण्‍यामध्‍ये मदत करते.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानIndiaभारत