शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
2
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
3
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
4
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
5
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
6
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
7
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
8
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
9
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
11
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
12
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
13
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
14
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
15
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
16
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
17
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
18
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
19
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
20
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला

48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग

By सिद्धेश जाधव | Updated: July 9, 2021 18:34 IST

Tecno Camon 17 Pro India Launch: Tecno Camon 17 सीरिजचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडियावर लाईव्ह करण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेजवर फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

टेक्नोने गेल्या महिन्यात जागतिक बाजारात Tecno Phantom X स्मार्टफोन लाँच केला आहे. जागतिक बाजारानंतर आता कंपनीने भारताकडे मोर्चा वळवला आहे. टेक्नो भारतात Tecno Camon 17 सीरिजमध्ये Tecno Camon 17 आणि Tecno Camon 17 Pro हे स्मार्टफोन सादर करू शकते. या सीरिजमधील स्मार्टफोन्समध्ये 48MP सेल्फी, 64MP क्वाड रियर कॅमेरा आणि 8GB रॅम असे भन्नाट फीचर्स असतील.  (Tecno Camon 17 Pro listed on Amazon India)

Tecno Camon 17 सीरिजचा प्रोडक्ट पेज अमेझॉन इंडियावर लाईव्ह करण्यात आला आहे. या प्रोडक्ट पेजवर फोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. या सीरिजच्या लाँचची अचूक अशी तारीख मात्र सांगण्यात आली नाही. हे फोन्स 26 जुलै किंवा 27 जुलैला अमेझॉन ‘Prime Day’ सेलमध्ये लाँच केले जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.  या स्मार्टफोन्सच्या भारतीय किंमतीची माहिती समोर आली नाही.  

Tecno Camon 17 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Camon 17 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 × 2460 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या टेक्नो स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक Helio G95 SoC देण्यात आली आहे. हा फोन Android 11 आधारित HiOS कस्टम युआयवर चालतो. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी पावर बटनमध्ये एम्बेडेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Tecno Camon 17 Pro मधील क्वॉड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन 48 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टेक्नो फोनमध्ये 25W फास्ट सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

Tecno Camon 17 चे स्पेसिफिकेशन्स 

Tecno Camon 17 हा स्मार्टफोन 1600 X 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या आयपीएस एलसीडी डिस्प्लेवर लाॅन्च करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित हाईओएस 7 सह आक्टाकोर प्रोसेसर तसेच मीडियाटेक हीलियो जी85 चिपसेटवर चालतो. या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. 

Tecno Camon 17 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 16 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी हा फोन 5,000एमएएचची बॅटरीला सपोर्ट करतो. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड