शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:31 IST

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे.

अमेरिकन टेक जायंट Google आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सतत कमी करत आहे. कंपनीने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. आता कंपनीने कर्चारी कपात करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे. ज्या विभागांसाठी ही ऑफर आहे, त्यात नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, सेंट्रल इंजिनिअरिंग, मार्केटिंग, रिसर्च अँड कम्युनिकेशन यांचा समावेश आहे. 

२०२३ पासून कर्मचाऱ्यांची संख्या सतत कपातसीएनबीसीच्या अहवालानुसार, गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. तेव्हापासून, कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या सतत कमी करत आहे. आता या नवीन ऑफर अंतर्गत किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले जाईल, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

कॉस्ट कटिंग कंपनीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक गुगलने पुष्टी केली आहे की, त्यांची बायआउट ऑफर, म्हणजेच ''Voluntary Exit Program'' फक्त अमेरिकन कर्मचाऱ्यांना लागू असेल. ही ऑफर अशा वेळी आली आहे, जेव्हा कंपनीचे वित्त प्रमुख अनत अश्केनाझी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, खर्चात कपात करणे, हे कंपनीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. दरम्यान, गुगल २०२५ मध्ये Ai पायाभूत सुविधांवर खर्च वाढवत आहे. त्यामुळेच नोकर कपात केल्याचे बोलले जात आहे.

चांगली कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना धोकागुगलच्या नॉलेज अँड इंफॉर्मेशन डिपार्टमेंट विभागात सुमारे २०,००० कर्मचारी आहेत. ऑक्टोबरमध्ये या युनिटची पुनर्रचना करण्यात आली, ज्याचे नेतृत्व गुगलचे कार्यकारी निक फॉक्स करत होते. फॉक्सने मंगळवारी एक मेमो पाठवला ज्यामध्ये म्हटले होते की, जे कर्मचारी कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, ते काम सोडू शकतात. जे कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल उत्साहित आहेत आणि चांगले काम करत आहेत, त्यांनीच कंपनीत राहावे. 

ऑफिसला या, अन्यथा काम सोडावर्क फ्रॉम होमबद्दलही कंपनीने कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने काही विभागातील कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यास सांगितले आहे. गुगलने नवीन वर्क फ्रॉम ऑफिस धोरण लागू केले आहे. अतिमहत्त्वाचा विभाग, मार्केटिंग, संशोधन, ज्ञान आणि माहिती आणि संवाद या विभागातील कर्मचाऱ्यांना कंपनीने ऑफिसला येण्यास सांगितले आहे. कंपनीने हे धोरण अमेरिकेतली कार्यालयांसाठी लागू केले आहे. जे कर्मचारी घरून काम करतात, पण कार्यालयापासून ८० किमी अंतराच्या आत राहतात. त्यांनी कार्यालयात येण्यास सुरूवात करावी असे सांगितले आहे.

टॅग्स :googleगुगलjobनोकरीEmployeeकर्मचारीtechnologyतंत्रज्ञानAmericaअमेरिका