शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुंदर पिचईंनी शब्द पाळला; चीनला दणका दिला, गुगलची भारतात शोधाशोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 10:37 IST

गुगल लवकरात लवकर मेड इन इंडिया टॅग असलेले पिक्सल फोन भारतात विकण्याच्या तयारीत आहेत.

अॅप्पलने चीनला दणका देऊन आयफोनची निर्मिती भारतात सुरु केली होती. आता गुगलने देखील भारताची वाट पकडली आहे. पिक्सलचे उत्पादन आता भारतात केले जाणार आहे. गुगल उत्पादन करणाऱ्या कंपन्यांशी संपर्क साधत आहे. यामुळे येत्या काळात पिक्सल मेड इन चायना नाही तर मेक इन इंडिया होणार आहे. 

गुगल लवकरात लवकर मेड इन इंडिया टॅग असलेले पिक्सल फोन भारतात विकण्याच्या तयारीत आहेत. यासाठी गुगलने फॉक्सकॉन, लावा आणि डिक्सन टेक्नॉलॉजीसोबत संपर्क साधला आहे. गुगलकडे व्हिएतनाम आणि भारत असे दोन पर्याय होते. परंतू, गुगलने भारताला निवडले आहे. सप्लायर्ससोबत चर्चा सुरु असून ती सफल ठरली तर गुगलची उत्पादने भारतात तयार होणार आहेत. भारत सरकारने स्थानिक पातळीवर स्मार्टफोन बनविणाऱ्या कंपन्यांना वेगवेगळ्या सवलती देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या कंपन्या आता भारताकडे येऊ लागल्या आहेत. दुसरीकडे चीनमध्ये उत्पादनावर संकटे येत असतात. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी तसे सुतोवाच केले होते. गुगल लवकरच पिक्सल फोन भारतात उत्पादित करू शकते असे ते म्हणाले होते. अॅप्पल आपल्या एकूण उत्पादनापैकी १८ टक्के उत्पादन हे २०२५ पर्यंत भारतात शिफ्ट करू शकते. गुगल पिक्सल फोनला भारतात चांगला प्रतिसाद मिळत नाहीय. यामुळे गुगलने प्रिमिअम ऐवजी मिड रेंज स्मार्टफोन लाँच करण्यावर भर दिला आहे. 

टॅग्स :chinaचीनgoogleगुगलSundar Pichaiसुंदर पिचई