शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सुस्साट! जगातील सुपरफास्ट इंटरनेटचा विक्रम; नेटफ्लिक्सवरील सर्वकाही एका सेकंदात डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 11:29 IST

सर्वात सुपरफास्ट इंटरनेटची नोंद; आधीचा इंटरनेट वेगाचा विक्रम मोडीत; वेग चारपटीनं वाढला

मुंबई: इंटरनेटचा वेग कमी असल्यानं मनस्ताप सहन करावा लागल्याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला असेल. इंटरनेटचा वेग जरा बरा असेल, तर बरीच कामं पटापट होतील, असा विचार अनेकांच्या मनात येतो. इंटरनेट सुपरफास्ट वेगानं सुस्साट चालावं, अशी अनेकांची इच्छा असते. अशा सगळ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी सर्वात वेगवान इंटरनेटचा नवा विक्रम नोंदवला आहे. या इंटरनेटचा वेग १७८ टेराबाईट्स (टीबीपीएस) प्रति सेकंद इतका आहे.भारतातील इंटरनेट किमान वेग २ एमबीपीएस इतका आहे. यावरून युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी नोंदवलेल्या सर्वात वेगवान इंटरनेटचा अंदाज बांधता येऊ शकेल. रॉयल ऍकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, एक्सटेरा आणि किड्डी रिचर्सच्या डॉ. लिडिया गाल्डिनो यांनी इंटरनेट वेग मोजणारा प्रकल्प हाती घेतला होता. याआधी सर्वाधिक इंटरनेट वेगाची नोंद ऑस्ट्रेलियात करण्यात आली होती. त्या इंटरनेटचा वेग ४४.२ टीबीपीएस इतका होता. मात्र आता नोंदवण्यात आलेला वेग त्याच्या चारपट आहे.इंटरनेटचा १७८ टीबीपीएस वेग थक्क करणारा आहे. या वेगात नेटफ्लिक्सवरील सर्वच्या सर्व कंटेट अवघ्या एका सेकंदात डाऊनलोड केला जाऊ शकतो. इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी जास्त क्षमतेच्या वेव्हलेंथचा वापर केला. सर्वसामान्यपणे इंटरनेटसाठी फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर होतो. याशिवाय संशोधकांनी नव्या ऍम्प्लिफाईड तंत्रज्ञानाचाही वापर केला. सध्याच्या पायभूत सुविधांमध्ये ४.५ टेराहर्ट्झची बँडविड्थ वापरली जाते. नवी ९ टेराहर्ट्झची बँडविड्थ काही मोजक्याच ठिकाणी वापरली जात आहे. मात्र हे सुपरफास्ट इंटरनेट १६.८ टेराहर्ट्झची बँडविड्थ वापरतं. त्यामुळे इंटरनेटचा वेग १२८ टेराहर्ट्झवर पोहोचतो. या सगळ्यामुळे खर्च मोठ्या प्रमाणात वाढेल, असं अनेकांना वाटू शकेल. मात्र युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ऍम्प्लिफायरचा वापर करण्यासाठी येणारा खर्च फायबर ऑप्टिक्स केबलसाठी येणाऱ्या खर्चापेक्षा कमी आहे.इंटरनेटचा १७८ टीबीपीएस वेग जबरदस्त आहे. मात्र सध्याच्या घडीला यावर केवळ प्रयोग सुरू आहेत. हे तंत्रज्ञान व्यवसायिक तत्त्वावर लवकर उपलब्ध होणार नाही. त्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. 

टॅग्स :Internetइंटरनेट