शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'गुगल' खास 'डुडल'च्या माध्यमातून तुम्हाला देणार वाढदिवसाच्या शुभेच्छा, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 12:03 IST

तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे.

ठळक मुद्देगुगल तुमच्या वाढदिवशी देखील तुम्हाला खास डुडल तयार करून शुभेच्छा देतं.सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. 2010 पासून गुगलने युजर्सना अशाप्रकारे डुडल तयार करून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली - गुगल नेहमीच रंगीबेरंगी महत्त्वपूर्ण डुडल तयार करून अनेक दिग्गजांना, त्यांच्या योगदानाला सलाम करत असतं. तर कधी महत्त्वाच्या तारखा व त्या दिवसाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन आपल्या युजर्सला खास डुडल तयार करून माहिती देत असतं. पण तुम्हाला माहिती आहे का? गुगल तुमच्या वाढदिवशी देखील तुम्हाला खास डुडल तयार करून शुभेच्छा देतं. मात्र यासाठी जीमेलवर लॉगइन करणं महत्त्वाचं आहे.

तुम्हालाही तुमच्या वाढदिवशी विशेष डुडल तयार करून गुगलकडून शुभेच्छा हव्या असतील तर सर्वप्रथम गुगलच्या सर्च इंजिनवर तुमच्या जीमेल अकाउंटवरून लॉगइन करणं अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यानंतर जीमेल आयडीवर तुम्ही बरोबर वाढदिवसाबाबतचे तसेच विचारण्यात आलेले इतर डिटेल्स द्या. डिटेल्स दिले असतील तरच गुगल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार आहे. गुगल एक खास डुडल तयार करून तुम्हाला या शुभेच्छा देईल. 

गुगल खास डुडल तयार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतं हे काही नवीन नाही कारण 2010 पासून गुगलने युजर्सना अशाप्रकारे डुडल तयार करून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता काळानुसार तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये नवनवीन बदल आणि खास गोष्टी देण्यात आल्या आहेत. फुगे, केकच्या माध्यमातून तर कधी कधी युजर्सना आवडणाऱ्या गोष्टींच्या मदतीने आकर्षक आणि हटके डुडल तयार करून गुगलकडून युजर्सना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

 

टॅग्स :googleगुगलDoodleडूडलtechnologyतंत्रज्ञान