शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
4
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
5
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
6
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
7
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
8
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
9
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
10
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
11
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
12
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
13
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
14
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
15
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
16
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
17
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
18
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
19
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
20
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा

दणदणीत फिचर्सनी सज्ज असुस झेनफोन एआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 12:02 PM

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि प्रोजेक्ट टँगो व डे ड्रीमचा सपोर्ट असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत लाँच केला आहे.

असुस कंपनीने भारतात तब्बल आठ जीबी रॅम आणि प्रोजेक्ट टँगो व डे ड्रीमचा सपोर्ट असणारा आपला झेनफोन एआर हा फ्लॅगशीप स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेेठेत लाँच केला आहे.आसुस झेनफोन एआर या मॉडेलमध्ये प्रथमच विस्तारीत सत्यता म्हणजेच ऑग्युमेंटेड रिअ‍ॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हिआर) अर्थात आभासी सत्यता या दोन्ही प्रकारांचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. म्हणजेच गुगलच्या टँगो आणि डे ड्रीम या दोन्ही प्रकारांना याचा सपोर्ट असून या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८२१ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम आठ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी इतके असेल. यात ५.७ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी म्हणजेच २५६० बाय १४०० पिक्सल्स क्षमतेचा सुपर अमोलेड डिस्प्ले असेल. हे मॉडेल अँड्रॉईडच्या ७.० नोगट प्रणालीवर चालणारे असून यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.  असुस झेनफोन एआर या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा २३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. यात अतिशय उच्च दर्जाचे सोनी आयएमएक्स ३१७ हे सेन्सर आहे. याशिवाय यात ट्रायटेक प्लस ऑटो-फोकस सिस्टीम, ड्युअल पीडीएएफ, आणि कंटिन्युअस फोकस आदींसह तीन अंशीय ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन व तीन अंशीय इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन आदी फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. या कॅमेर्‍याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. याशिवाय यात मागील बाजूसच फिशआय लेन्सयुक्त ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा आहे. हे मॉडेल ग्राहकांना ४९,९९९ रूपये मुल्यात फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.