Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: May 12, 2022 05:11 PM2022-05-12T17:11:43+5:302022-05-12T17:12:53+5:30

Sony Xperia Ace 3 स्मार्टफोन कंपनीचा सर्वात स्वस्त 5G फोन आहे, जो 13MP कॅमेरा, Android 12 आणि 4,500mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Sony Xperia Ace 3 Launched Price Specifications And Details  | Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

Sony नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, इतके भन्नाट आहेत Xperia Ace 3 चे फीचर्स 

Next

Sony Xperia Ace 3 कंपनीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन म्हणून बाजारात आला आहे. या एंट्री लेव्हल स्मार्टफोनमध्ये HD+ डिस्प्ले, 5G-ready Qualcomm चिपसेट आणि 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. सध्या हा फोन जपानमध्ये सादर करण्यात आला आहे. पुढे आम्ही Sony Xperia Ace 3 च्या किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती दिली आहे.  

Sony Xperia Ace 3 चे स्पेसिफिकेशन्स  

Sony Xperia Ace 3 मध्ये 5.5-inch एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे, जो वॉटरड्रॉप नॉच डिजाइनसह येतो. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus प्रोटेक्शनसह येतो. या फोनमध्ये प्रोसेसरसाठी Snapdragon 480 5G चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. सोबत 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज मिळते. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं स्टोरजे वंध्यत्वत येते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. 

यात सेल्फीसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे, तर मागे 13MP चा एक कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे, जो एलईडी फ्लॅशसह येतो. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी USB-PD चार्जिंग आणि रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह IP6X डस्टप्रूफ आणि IPX5 / IPX8 वॉटर रेजिस्टन्स रेटिंग मिळते.  

किंमत  

Xperia Ace III ची किंमत JPY 34,408 म्हणजे सुमरे 20,525 रुपये आहे. हा फोन जापान मध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. कंपनीनं फोन हँडसेट ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि ब्रिक ओरेंज कलरमध्ये सादर केला आहे.  

Web Title: Sony Xperia Ace 3 Launched Price Specifications And Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.