शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

स्मार्टफाेन कंपनी भारतात देणार एक लाखाहून अधिक नाेकऱ्या; ७०० दशलक्ष डॉलर्सची करणार गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 07:30 IST

चीनमधून बाहेर पडण्याची योजना २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढत चालल्यामुळे ॲपलने आपले प्रकल्प चीनबाहेर हलविण्याची योजना आखली असून त्याच योजनेंतर्गत फॉक्सकॉन भारतात येत आहे. ‘ॲपल’चा भागीदार असलेला फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी समूह भारतात ७०० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.  बंगळूरू येथे मोठा प्रकल्प उभारणार असून त्याद्वारे १ लाखांहून अधिक लोकांना नोकऱ्याही मिळणार आहेत. 

सूत्रांनी सांगितले की, ‘हॉन हाई प्रिसिजन इंडस्ट्रीज कंपनी’ या आपल्या फ्लॅगशिप प्रकल्पामुळे ओळखली जाणारी ‘फॉक्सकॉन’ बंगळुरू विमानतळाजवळ ३०० एकरवर आयफोन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात ॲपलच्या हँडसेटची जुळवणी केली जाणार आहे तसेच इलेक्ट्रिक वाहनांचे सुटे भाग बनविण्यासाठीही प्रकल्पाचा उपयोग केला जाणार आहे. 

चीनमधून बाहेर का?n हा ‘फॉक्सकॉन’चा भारतातील सर्वांत मोठा एकल प्रकल्प ठरणार आहे. ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वांत मोठा उत्पादक चीनचा किताब ‘फॉक्सकॉन’च्या स्थलांतरामुळे धोक्यात येऊ शकतो.n या प्रकल्पात १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. चीनच्या झेंगझोऊ येथील फॉक्सकॉन प्रकल्पात २ लाख लोक काम करतात. n कोविड-१९ साथीमुळे तेथील उत्पादन घटले आहे. त्यामुळे ॲपलने चीनबाहेर निर्मिती प्रकल्प वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

भारतात २०१७ पासून आयफाेनचे उत्पादनॲपलने २०१७ पासून भारतात आयफाेनचे उत्पादन सुरू केले हाेते. फाॅक्सकाॅन, विस्ट्राॅन आणि पेगाट्राॅन हे त्यासाठी ॲपलचे भारतातील भागीदार आहेत. त्यांना सरकारच्या पीएलआय याेजनेचाही लाभ मिळत आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये तब्बल १ अब्ज डाॅलर्स एवढ्या मूल्याचे आयफाेन भारतातून निर्यात झाले हाेते. स्मार्टफाेन निर्यातीचा हा उच्चांक हाेता. भारतातून सर्वच स्मार्टफाेनची निर्यात सातत्याने वाढत आहे.

चीनमध्ये उत्पादनावर भर का हाेता?चीनमध्ये स्वस्त कामगार हा एकच मुद्दा नाही तर स्मार्टफाेन जुळवणीसाठी आवश्यक असणारे काैशल्य असलेले मनुष्यबळ व तंत्रज्ञान चीनमध्ये उपलब्ध आहे. ते अमेरिकेतही नाही, असे ॲपलचे सीईओ टीम कुक यांनी सांगितले हाेते.

टॅग्स :Apple Incअॅपलchinaचीन