मोटोरोलाने त्यांचा नवा स्मार्टफोन मोटो जी १०० प्रो चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन आहे. सुरुवातीपासून हा फोन चर्चेत आहे. मोटो जी १०० प्रो स्मार्टफोनमधील खासियत म्हणजे, यात ग्राहकांना भलामोठा डिस्प्ले आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
हा स्मार्टफोन तीन व्हेरिएंटसह बाजरात उपलब्ध झाला आहे. मोटो जी १०० प्रोच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १ हजार ३३९ युआन म्हणजेच जवळपास १६ हजार ७०० रुपये इतकी आहे. तर, १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन १७ हजार ९०० रुपयांत उपलब्ध आहे. १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची २० हजार ३०० रुपये इतकी आहे.
मोटो जी १०० प्रो: डिस्प्लेया स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना ६.६७ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०Hz रिफ्रेश आणि १००० निट्स ब्राइटनेससह येतो. स्क्रीनचे संरक्षण करण्यासाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ वापरण्यात आला आहे.
मोटो जी १०० प्रो: कॅमेराया फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे, जो अंधारतही चांगल्या कामगिरीची हमी देतो.
मोटो जी १०० प्रो: स्टोरेज आणि बॅटरीहा फोन ८ जीबी, १२ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज पर्यायासह येतो, जे मल्टीटास्किंग आणि गेमिंगसाठी योग्य आहे. या फोनमध्ये ६ हजार ७२० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन पाइन स्मोक ब्लू, टुंड्रा ब्लू, क्लाउड्स इंक आणि ब्लॅक आणि सिल्क पर्पल या चार रंगात उपलब्ध आहे. लवकरच हा फोन भारतीय बाजारात दाखल होईल, अशी माहिती आहे.