सोळा जिल्हयांवर दुष्काळी छाया!
By Admin | Updated: July 15, 2015 23:12 IST2015-07-15T23:12:34+5:302015-07-15T23:12:34+5:30
लोकमत विशेष

सोळा जिल्हयांवर दुष्काळी छाया!
ल कमत विशेषपावसाचे प्रमाण खूपच कमी पुणे : जून महिन्यात काही ठिकाणी बरसल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने दिलेल्या ओढीमुळे राज्याची स्थिती बिघडली आहे. १६ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्याने या जिल्हयांवर दुष्काळाची छाया दिवसेंदिवस गडद होऊ लागली आहे. दुष्काळाच्या या झळा प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्हयांना बसत आहेत. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर व परभणी जिल्हयात पडला असून तो सरासरीपेक्षा तब्बल ५३ टक्क्यांनी कमी आहे.यंदा देशात सरासरीपेक्षा कमी केवळ ८८ टक्केच पाऊस पडणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहिर केले होते. त्यावरून महाराष्ट्रातही यंदा कमी पाऊस पडणार, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शेतकरी अगोदरपासून चिंताग्रस्त आहेत. अशातच पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांच्या डोळयात पाणी आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी खरीपाची पेरणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पिके उगवली आहेत. मात्र पाऊस नसल्याने ती जळू लागली आहेत. यामुळे अनेक शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. जून महिन्यात उशीरा राज्यात दाखल झाल्यानंतरही चांगला पाऊस पडल्याने शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवडयात गायब झालेला पाऊस अर्धा जुलै महिना संपायला आला तरी परतलेला नाही. त्यामुळे राज्यातील स्थिती चिंताजनक बनत चालली आहे. राज्यातील १६ जिल्हयांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस पडल्याने तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आतापर्यंत राज्यात सर्वात कमी पाऊस हा लातूर आणि परभणी जिल्हयात पडला आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्हयात ५० टक्के उस्मानाबाद जिल्हयात सरासरीपेक्षा ४९ टक्के कमी पाऊस, जळगाव जिल्हयात ४४ टक्के कमी पाऊस पडला आहे. मराठवाडयात जूनपासून आतापर्यंत तुरळक सोडता पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे तेथे स्थिती खूपच भयावह आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. विशेष म्हणजे, कोकणासारख्या सर्वाधिक पावसाच्या भागातील २ जिल्हयांनाही दुष्काळाने घेरले आहे. तेथेही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे.-----------चौकट---पंधरा जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊसराज्यातील १५ जिल्हयांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडला आहे. हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार सरासरीपेक्षा जरी पाऊस २० टक्क्यांपर्यंत कमी पडला तरी तो सरासरीएवढाच पकडला जातो. त्यानुसार १५ जिल्हयांमध्ये पावसाचे प्रमाण आतापर्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त, अमरावतीत १६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.----------