स्वस्तातील दर्जेदार स्मार्टफोन भारतात आणून गेल्या वर्षांत कमालीची लोकप्रिय झालेली चीनची कंपनी शाओमी आज भारतीयांना एक आश्चर्याचा धक्का देणार आहे. शाओमी आज तिची उपकंपनी रेडमीचा 20 आणि रेडमी के20 प्रो लाँच करणार आहे. मात्र, हे फोन परवडणाऱ्या किंमतीत असले तरीही लाँचिंगच्या पूर्वसंध्येला शाओमीने ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
शाओमीने गेल्या काही आठवड्यांपासून रेडमीच्या 20 च्या लाँचिंगची तयारी आणि जाहिरात सुरु केली होती. रेडमीकडे 48 मेगापिक्सल कॅमेराचे दोन फोन आधीच बाजारात आहेत. मात्र, नुकताच रेडमीच्या भारतीय सीईओंनी सॅमसंगच्या 64 मेगापिक्सलच्या कॅमराने काढलेला फोटो ट्विटरवर टाकून लवकरच 64 मेगापिक्सलचा फोन येत असल्याची घोषणा केली होती. यामुळे रेडमीच्या 20 प्रो कडे लोकांच्या नजरा वळल्या होत्या.
रेडमी इंडियाच्या ट्विटनुसार Redmi K20 Pro चे एक खास व्हर्जनही आज लाँच केले जाणार आहे. या मोबाईलची किंमत 4,80,000 रुपये असणार आहे. कंपनीने प्रीमियम गोल्ड बैक फिनिश फोटो शेअर केला आहे. त्यावर K लिहिले आहे.