सेनहैजरचा प्रिमीयम वायरलेस हेडफोन
By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:07 IST2017-07-22T15:49:42+5:302017-07-25T16:07:40+5:30
सेनहैजर कंपनीने भारतीय ग्राहकांना तब्बल ११,९९० रूपये मूल्य असणारा सीएक्स ७.० बीटी हा प्रिमीयम वायरलेस हेडफोन सादर केला आहे.

सेनहैजरचा प्रिमीयम वायरलेस हेडफोन
सेनहैजर कंपनीने भारतीय ग्राहकांना तब्बल ११,९९० रूपये मूल्य असणारा सीएक्स ७.० बीटी हा प्रिमीयम वायरलेस हेडफोन सादर केला आहे.
अनेक वायरलेस हेडफोन किफायतशीर मूल्यात उपलब्ध होत असतांना काही कंपन्या अत्यंत दर्जेदार फिचर्स असणारे महागडे मॉडेलदेखील उपलब्ध करत आहेत. सेनहैजर सीएक्स ७.० बीटी हेदेखील यातीलच एक मॉडेल होय. यात मल्टी कनेक्टीव्हिटीचा पर्याय देण्यात आला आहे. याच्या मदतीने हा हेडफोन एकदाच स्मार्टफोनसह अन्य कोणत्याही उपकरणाला (उदा. संगणक, लॅपटॉप आदी) उपकरणाशी ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येतो. तर यात एनएफसीचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे. यात चांगल्या दर्जाची बॅटरी प्रदान करण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दहा तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे युएसबी चार्जरच्या मदतीने ही बॅटरी अवघ्या दीड तासात चार्ज करणे शक्य आहे. यात नेकबँड डिझाईन प्रदान करण्यात आली असून हा हेडफोन वजनाने अतिशय हलका आहे. यासोबत कानात अगदी तंतोतंत बसण्याजोगे चार इयरबडचे पर्याय देण्यात आले आहेत. हे मॉडेल लवकरच ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.