शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर हार्ट इमोजी पाठवल्यास होऊ शकतो तुरुंगवास अन् 20 लाखांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:52 IST

WhatsApp : रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या सायबर क्राईम तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुम्हाला कायदेशीर अडचणीत येऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे आज जगातील सर्वात लोकप्रिय मल्टीमीडिया मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक पर्सनल ते प्रोफेशनल चॅट करतात. परंतु व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करण्याची ही सवय तुम्हाला तुरुंगात टाकू शकते आणि 20 लाख रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. रिपोर्टनुसार, सौदी अरेबियाच्या सायबर क्राईम तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास तुम्हाला कायदेशीर अडचण येऊ शकते.

20 लाखांचा दंड अन् पाच वर्षांच्या तुरुंगवासरिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, सौदी अरेबियामध्ये व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवल्यास 100,000 सौदी रियाल म्हणजेच सुमारे 20 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. या दंडासोबत दोन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते. गल्फ न्यूजमधील एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सौदी अरेबियाच्या अँटी फ्रॉड असोसिएशनचे सदस्य अल मोअताज कुतबी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅपवर रेड हार्ट इमोजी पाठवणे म्हणजे त्रास देणे होय. ते पुढे म्हणाले की ऑनलाइन चॅट दरम्यान काही फोटो आणि इमोजी छळाच्या गुन्ह्यात बदलू शकतात, परंतु एखाद्याने त्याच्याविरुद्ध खटला दाखल केला तरच त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

लाल गुलाब इमोजी सुद्धा धोकादायक!या संदर्भात लोकांना चेतावणी देणारे एक निवेदन अल मोअताज कुतबी यांनी जारी केले आहे, ज्यामध्ये रेड हार्ट इमोजीबद्दल विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. अल मोअताज कुतबी यांच्या मते, लैंगिक संबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या शरीराला स्पर्श करणार्‍या किंवा तसे करण्याचा इरादा असलेल्या दुसर्‍या व्यक्तीकडे केलेले प्रत्येक विधान, कृती किंवा हावभाव म्हणून छळ केला जाऊ शकतो. त्यात इमोजीचाही समावेश आहे. रेड हार्ट इमोजी व्यतिरिक्त, लाल गुलाब इमोजी देखील तुम्हाला अडचणीत आणू शकतात.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान