शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! सर्च करुन बँकेच्या साईटवर जाताय?, वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 13:02 IST

SBI Customers Alert : फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)  मोलाचा सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - बँकेचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने अगदी कमी वेळात सहज आणि वेगाने होतात. त्यामुळेच ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याकडे हल्ली अनेकांचा अधिक कल असतो. इंटरनेट आणि स्मार्टफोन्समुळे बँकिंग खूपच सोपे केले आहे. मात्र सध्या ऑनलाईन फ्रॉड वाढले आहेत. अशा फ्रॉडपासून वाचण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India)  मोलाचा सल्ला दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी सावध करत असते. यावेळी ही बँकेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ग्राहकांना अलर्ट केलं आहे. 

युजर्स अनेकदा बँकेचे व्यवहार करताना गुगल सर्चचा आधार घेतात. आणि समोर जे दिसेल त्यावर क्लिक करतात. बँकेच्या साईटवर जाण्यासाठी गुगल सर्च किंवा इतर ब्राउजरचा वापर करून साइट व्हिझीट केली जाते. मात्र आता एसबीआयने सर्व सर्च रिझल्ट बरोबर असतीलच असं नाही. या समस्येपासून वाचण्यासाठी बँकेने काही हेल्पलाइन क्रमांक आणि वेबसाईट जारी केली आहे. गुगल सर्चवर अनेक ग्राहक फेक साईट्सवर जातात. एसबीआयने बँकेविषयी अपडेट मिळवण्यासाठी https://bank.sbi या वेबसाईटवरच जा. तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती मिळेल असं म्हटलं आहे.

टोल फ्री क्रमांकावरून मिळवा योग्य माहिती

गुगलवर सर्च करून अनेकदा ग्राहक त्याठिकाणी आलेल्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करतात. काही वेळा हा नंबर चुकीचा असू शकतो. ज्यामुळे तुम्ही फसवणूक होऊ शकते. बँकेने काही टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. एसबीआय ग्राहक  1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080 26599990 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून बँकेविषयी हवी ती माहिती  मिळवू शकतात. 

मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला

मोबाईल बँकिंग दरम्यान काय काळजी घ्यावी यासाठी युजर्संना सूचना केल्या आहेत. 

फोनच्या IMEI नंबर नोट करुन ठेवा

फिशिंग किंवा फ्रॉड प्रकरणात फोनच्या IMEI नंबरची गरज असते. त्यामुळे हँडसेटचा IMEI नंबर लिहून ठेवा. डिव्हाईसच्या IMEI नंबरसाठी सेटिंग अ‍ॅप्समध्ये जावू शकता. तसेच फोनवरून *#06# डायल करूनही IMEI नंबर मिळवता येतो. .

वेळोवेळी घ्या डेटा बॅकअप 

स्टेट बँक ऑफ इंडियाने युजर्संना फोनमध्ये डेटा बॅकअप घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास डेटाला ट्रॅक आणि सिक्योर करता येतो. तसेच एक्स्ट्रा सिक्योरिटी साठी पिन कोड पासकोड किंवा बायोमॅट्रिक पासवर्डने प्रोटेक्ट करा.

डेटा ट्रान्सफर करताना त्याला स्कॅन करा

संगणकाहून मोबाईलवर डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसने स्कॅन करा. यामुळे मोबाईल करप्ट किंवा व्हायरस असलेली फाईल मोबाईलमध्ये एंटर होणार नाही. स्टेप मोबाईल आणि मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या युजरचे बँकिंग डिटेल्सची सिक्योरिटीसाठी महत्त्वपूर्ण आहे.

फोन करा अपडेट 

फोनला नेहमी लेटेस्ट सॉफ्टवेअरने अपडेट ठेवा. नवीन फीचर्ससोबत मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स मध्ये लेटेस्ट सिक्योरिटी पॅच दिला आहे. हे डिव्हाईसला व्हायरस अटॅकच्या धोक्यापासून वाचवण्यात मदत करते.

पासवर्ड आणि युजरनेम सेफ ठेवा 

फ्रॉडपासून सुरक्षित राहण्यासाठी फोनमध्ये कधीही बँकिंग पासवर्ड, युजरनेम किंवा एटीएम पिन सेव्ह करू नका. जर असे असेल तर लॉक फीचर जरूर ठेवा.

कधीच करू नका या चुका 

फोन आणि डेटाची सिक्योरिटीसाठी सर्वात आधी फोनला आपल्यापासून दूर ठेवू नका. तुम्ही ज्या अ‍ॅपचा वापर करत नसाल तर ते डिलीट करा. तसेच कोणत्याही सार्वजनिक वायफाय नेटवर्क्सचा वापर करू नका. त्याला फोन कनेक्ट करू नका.

टॅग्स :SBIएसबीआयbankबँकMONEYपैसाfraudधोकेबाजी