शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

वेगवान प्रोसेसर आणि S Pen सपोर्टसह नवीन Samsung W22 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: October 14, 2021 7:10 PM

Samsung New Foldable Phone Samsung W22 5G: Snapdragon 888 चिपसेट, S Pen सपोर्टसह Galaxy Z Fold3 5G चा रीब्रँड व्हर्जन Samsung W22 5G नावाने चीनमध्ये लाँच झाला आहे.

Samsung ने चीनमध्ये Samsung W22 5G फोल्डेबल फोन लाँच केला आहे. हा फोन Galaxy Fold 3 5G स्मार्टफोनचा रिब्रँड व्हर्जन आहे. यात 7.6-इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले, 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट, Snapdragon 888 चिपसेट असे स्पेसिफिकेशन्स मिळतात. चला जाणून घेऊया Samsung W22 5G स्मार्टफोनची किंमत आणि फीचर.  

Samsung W22 5G ची किंमत 

Samsung W22 5G स्मार्टफोनची किंमत चीनमध्ये 16,999 CNY (सुमारे ₹ 1,98,800) ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.  

Samsung W22 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung W22 5G स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. एक कव्हर स्क्रीन आणि फोन उघडल्यावर मिळणारी मोठी मुख्य स्क्रीन. मोठया मुख्य स्क्रीनवर कंपनीने अंडर डिस्प्ले कॅमेरा दिला आहे, त्यामुळे व्हिडीओ किंवा कंटेंट बघताना कॅमेरा कटआऊटचा व्यत्यय येत नाही. या फोनमध्ये 7.6 इंचाचा QXGA+ डायनॅमिक AMOLED मुख्य डिस्प्ले आणि 6.2 इंचाचा एचडी+ डायनॅमिक AMOLED कवर डिस्प्ले देण्यात आला आहे. हे दोन्ही डिस्प्ले 10 ते 120Hz पर्यंतच्या अ‍ॅडॅप्टिव रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात.   

सॅमसंग W22 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट दिला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 512GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित वनयूआयवर चालतो. या थर्ड जनरेशन सॅमसंग फोल्डेबल फोनमध्ये 4,400एमएएचची ड्युअल बॅटरी देण्यात आली आहे जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

या फोल्डेबल फोनमध्ये एकूण 5 कॅमेरे आहेत. W22 5G च्या बॅकपॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 12 मेगापिक्सलचा वाईड अँगल सेन्सर आणि 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या कव्हर डिस्प्लेवर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. सॅमसंगच्या या नव्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या मुख्य डिस्प्लेच्या डावीकडे 4 मेगापिक्सलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान