अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह येऊ शकतो Samsung Galaxy Z Fold3; लाँचपूर्वीच कॅमेरा स्पेसिफिकेशन्स लीक
By सिद्धेश जाधव | Updated: July 2, 2021 15:33 IST2021-07-02T15:32:07+5:302021-07-02T15:33:35+5:30
Samsung Galaxy Z Fold3 launch: Samsung लवकरच Galaxy Z Fold3 लाँच करणार आहे. तत्पूर्वी या स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स टिपस्टर Tron ने लीक केले आहेत.

सौजन्य: GSM ARENA
Samsung दोन फोल्डेबल सीरिजमध्ये स्मार्टफोन लाँच करते. या सिरीजमध्ये तिसऱ्या जेनरेशनचे फोल्डेबल फोन Galaxy Z Fold3 आणि Galaxy Z Flip3 पुढल्या महिन्यात अमेरिका आणि युरोपमध्ये लाँच केले जाऊ शकतात. तसेच भारतात Galaxy Z Fold3 स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच केला जाईल, अशी चर्चा आहे. याबाबत कंपनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. लाँचपूर्वीच Fold3 संबंधित बरीच माहिती लीक झाली आहे. आता एका रिपोर्टमध्ये Samsung Galaxy Z Fold 3 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याची माहिती सांगण्यात आली आहे.
Samsung Galaxy Z Fold3 च्या कॅमेऱ्याची माहिती
Samsung लवकरच Galaxy Z Fold3 लाँच करणार आहे. तत्पूर्वी या स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स टिपस्टर Tron ने लीक केले आहेत. कंपनीच्या या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. हा एक Sony IMX555 सेन्सर असेल. 1/1.76-इंचाचा हा सेन्सर ड्युअलफेस-डिटेक्शन ऑटोफोकसला सपोर्ट करेल. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 12MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 12MP ची टेलीफोटो लेन्स देण्यात येईल.
Galaxy Z Fold3 मधील सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे या स्मार्टफोनमधील अंडर डिस्प्ले कॅमेरा सेन्सर. या फोनच्या फोल्डेबल डिस्प्लेमध्ये 16MP चा कॅमेरा अंडर डिस्प्ले कॅमेरा सेन्सर दिला जाईल, असा दावा टिप्सटर ट्रॉनने केला आहे. त्याचबरोबर कव्हर डिस्प्लेमध्ये पंच होल कटआउटमध्ये 10 MP चा अजून फ्रंट कॅमेरा देण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.
यापूर्वी आलेल्या रिपोर्ट्सनुसार Galaxy Z Fold3 मध्ये 7.55-इंचाचा फोल्डेबल डिस्प्ले मिळू शकतो. या फोनमधील कव्हर डिस्प्ले 6.2-इंचाचा असेल. या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात येईल. तसेच हा फोन S Pen ला देखील सपोर्ट करेल.