सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ची नवीन आवृत्ती भारतात सादर

By शेखर पाटील | Published: October 11, 2017 01:14 PM2017-10-11T13:14:40+5:302017-10-11T14:31:39+5:30

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्टी टॅब ए या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या नावाने हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहे

Samsung Galaxy Tab new edition launched in India | सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ची नवीन आवृत्ती भारतात सादर

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए ची नवीन आवृत्ती भारतात सादर

googlenewsNext
ठळक मुद्देसॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलमध्ये ८ इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूएक्सजीए म्हणजे १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आला आहेयात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्टी टॅब ए या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर केली असून यात अनेक सरस फिचर्सचा समावेश आहे. सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या नावाने हे नवीन मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. हा टॅबलेट ग्राहकांना ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आला असून याचे मूल्य १७,९९९ रूपये असेल. हा टॅबलेट अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर सॅमसंग कंपनीचा टचविझ हा युजर इंटरफेस देण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलमध्ये ८ इंच आकारमानाचा आणि डब्ल्यूएक्सजीए म्हणजे १२८० बाय ८०० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते २५६ जीबीपर्यंत वाढविता येणार आहे. एलईडी फ्लॅश आणि एफ/१.९ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने एचडी क्षमतेचे व्हिडीओ रेकॉर्डींग करणे शक्य आहे. तर यात एफ/२.२ अपार्चरयुक्त ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७)मध्ये फोर-जी एलटीई नेटवर्क सपोर्ट देण्यात आला आहे. यात ब्ल्यु-टुथ आणि वाय-फाय नेटवर्क कनेक्टिव्हिटी असून सोबत जीपीएस/ए-जीपीएस, ग्लोनास आदी फिचर्स देण्यात आले आहेत. या मॉडेलमध्ये तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १४ तासांचा व्हिडीओ बॅकअप तर १५ तासांचा फोर-जी टॉकटाईम मिळत असल्याचा कंपनीने दावा केला आहे. म्हणजेच ही जंबो बॅटरी या टॅबलेटचे प्रमुख फिचर असेल. यातील दुसरे लक्षणीय फिचर म्हणजे सॅमसंग कंपनीचा बिक्सबी हा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट होय. सॅमसंग कंपनीने याला विकसित केले असून भारतीय युजर्ससाठी अलीकडेच सादर केले आहे. या कंपनीच्या काही फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये हा असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. आता सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए (२०१७) या मॉडेलच्या माध्यमातून टॅबलेटवरही हा असिस्टंट वापरता येणार आहे.

Web Title: Samsung Galaxy Tab new edition launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.