सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22 

By सिद्धेश जाधव | Published: September 18, 2021 11:41 AM2021-09-18T11:41:57+5:302021-09-18T11:42:59+5:30

Samsung Galaxy S22 Release Date: गीकबेंचनुसार Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 8GB RAM व Android 12 सह येईल आणि यात Taro मदरबोर्ड असेल.

Samsung galaxy s22 listed on geekbench to launch with snapdragon 895 soc and android 12  | सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22 

हा प्रतीकात्मक फोटो आहे. (सौजन्य: Letsgo Digital)

Next

दरवर्षी Samsung आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची सुरवात ‘Galaxy S’ सीरिजपासून करते. या सीरिजमधील स्मार्टफोन सर्वात वेगवान प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि शानदार डिजाईनसह सादर केले जातात. यावर्षी देखील कंपनीने सुरवातीलाच ही सीरिज सादर केली होती आणि आता पुढील वर्षीच्या फ्लॅगशिप सीरिजच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. आता आगामी Samsung Galaxy S22 स्मार्टफोन बेंचमार्क साइट Geekbench वर दिसला आहे.  

गीकबेंचवर हा फोन Samsung SM-S901U मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगनुसार हा फोन 8GB RAM व Android 12 सह येईल आणि यात Taro मदरबोर्ड असेल. टॅरो हे Snapdragon 895 चे कोडनेम आहे, जो क्वॉलकॉमचा नवीन पॉवरफुल फ्लॅगशिप प्रोसेसर असेल. या लिस्टिंगवरून असे वाटत आहे कि Galaxy S22 या प्रोसेसरसह येणारा पहिला फोन असेल.  

या व्यतिरिक्त गीकबेंच लिस्टिंगमधून फोनची इतर कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु गीकबेंचवर फोनने सिंगल कोर टेस्टमध्ये 475 आणि मल्टीकोर टेस्टमध्ये 1393 इतके पॉईंट्स मिळवले आहेत. दरवर्षी सॅमसंग आपले फ्लॅगशिप फोन्स दोन प्रोसेसरसह सादर करते. अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये क्वालकॉम प्रोसेसर दिला जातो. तर आशिया आणि इतर काही भागांमध्ये कंपनी स्वतःच्या एक्सिनॉस प्रोसेसरचा वापर करते. गिकबेंचवरील ही लिस्टिंग यूएसमध्ये सादर होणाऱ्या मॉडेलची आहे. भारतासह इतर काही ठिकाणी सादर होणारा एक्सिनॉस मॉडेल लवकरच समोर येऊ शकतो.  

Web Title: Samsung galaxy s22 listed on geekbench to launch with snapdragon 895 soc and android 12 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.