उरले काही दिवस! निम्म्या किमतीत मिळतोय Samsung चा प्रीमियम 5G फोन, पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 06:30 PM2023-12-12T18:30:15+5:302023-12-12T18:30:51+5:30

Samsung Galaxy S22 5G Price Sale: 9 डिसेंबरपासून सुरू झालेला Flipkart चा सेल 16 डिसेंबरला संपणार आहे.

Samsung Galaxy S22 5G Price Sale: No coupon codes or exchanges; Samsung's premium 5G phone is available at half price, see details | उरले काही दिवस! निम्म्या किमतीत मिळतोय Samsung चा प्रीमियम 5G फोन, पाहा डिटेल्स...

उरले काही दिवस! निम्म्या किमतीत मिळतोय Samsung चा प्रीमियम 5G फोन, पाहा डिटेल्स...

Samsung Galaxy S22 5G Price Sale: नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या Big Year End Sale चा लाभ घेऊ शकता. या सेलमध्ये अनेक फ्लॅगशिप फोन अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. सॅमसंगचा गेल्या वर्षी लॉन्च झालेला फ्लॅगशिप फोन Samsung Galaxy S22 देखील या सेलमध्ये जवळपास निम्म्या किमतीत मिळतोय. 9 डिसेंबरपासून सुरू झालेला हा सेल 16 डिसेंबरला संपणार आहे. 

हा स्मार्टफोन 40 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय. कंपनीने लॉन्चिंगवेळी याची किंमत 72 हजार रुपये ठेवली होती. या फोनमध्ये दमदार बॅटरी, आकर्षक कॅमेरा आणि उत्कृष्ट डिस्प्ले मिळतो. फोटोग्राफीच्या बाबतीत हा फोन आयफोनसारख्या प्रीमियम फोन्सलाही टक्कर देतो. गेमिंगसाठीही हा फोन अतिशय चांगला आहे.

Samsung Galaxy S22 5G ची किंमत
सॅमसंगच्या या फोनवर आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. तुम्ही हा सूमारे अर्ध्या किमतीत खरेदी करू शकता. ब्रँडने हा फोन गेल्या वर्षी, म्हणजे 2022 मध्ये 72,999 रुपयांच्या किमतीत लॉन्च केला होता. सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 39,999 रुपयांना मिळतोय. ही किंमत फ्लॅट डिस्काउंटसह आहे. म्हणजेच यावर तुम्हाला कोणतेही कार्ड किंवा कूपन वापरावे लागणार नाही.

फोनचे फीचर्स
या किंमतीत फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. याशिवाय कंपनी HDFC कार्डवर 10 टक्के अतिरिक्त सूट देत आहे. फोनमध्ये 6.1-inch AMOLED डिस्प्ले मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो. यात ट्रिपल कॅमरा सेटअप मिळतो. मेन लेन्स 50MP, सेकंडरी लेन्स 12MP आणि तिसरा कॅमेरा 10MP चा आहे. याशिवाय, फ्रंटमध्ये 10MP सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने यात 3700mAh बॅटरी दिली आहे. तसेच, 25W फास्ट चार्जिंग सपोर्टही मिळतो.

का घ्यावा?
तुम्हाला कमी किमतीत प्रीमियम फोन हवा असेल, तर तुम्ही हा खरेदी करू शकता. हा फोन कंपनीचा फ्लॅगशिप डिवाइस आहे. यावर तुम्हाला Android 14, 15 आणि Android 16 पर्यंतचे अपडेट्स मिळतील. हा चांगल्या आयपी रेटिंगसह येतो. एकूणच हा फोन एक चांगला पर्याय आहे.
 

Web Title: Samsung Galaxy S22 5G Price Sale: No coupon codes or exchanges; Samsung's premium 5G phone is available at half price, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.