Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 15:31 IST
Samsung Galaxy Note 10 And Galaxy Note 10+ Booking: सॅमसंगने 8 ऑगस्टला फोनची आगाऊ बुकिंग सुरु केली आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून मिळणार आहे.
Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
बंगळुरू: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतीय बाजारात नोट सिरिजचे दोन फोन लाँच केले आहेत. या फोनचे नाव Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ असे असून बंगळुरूमध्ये हे फोन लाँच झाले. याआधी हे फोन न्यूयॉर्कमध्ये लाँच झाले होते.
सॅमसंगने 8 ऑगस्टला फोनची आगाऊ बुकिंग सुरु केली आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून मिळणार आहे. ग्राहकांना हा फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवरही मिळणार आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 मध्ये 1080x2280 पिक्सल रिझॉल्यूशनचा डायनॅमिक अॅमोल्ड पॅनलचा 6.3 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. यामध्ये सॅमसंगनेच विकसित केलेला ऑक्टा-कोर Exynos 9825 प्रोसेसर आहे. कॅमेरा फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 12 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसोबत 16 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेंस कॅमेरा असून 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर सेल्फीसाठी फोनमध्ये 80 डिग्री व्ह्यू सोबर 10 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बॅटरीफोनमध्ये 3500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 25 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6 एक्सिस सेन्सरचे S-Pen देण्यात आले आहे. जे गायरोस्कोप आणि अॅक्सलरेशन सेन्सरसोबत येते. या फोनमध्ये 4 जी कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. अमेरिका, कोरियामध्ये ५ जी फोन देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10प्लससॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 प्लस मध्ये 2जीबी रॅम 256जीबी आणि 512जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी १ टेराबाईट पर्यंत वाढविता येते. डिस्प्ले 1440x3040 पिक्सलचा 6.8 इंचाचा QHD+ इनफिनिटी-ओ देण्यात आला आहे. कॅमेराकॅमेराचे फिचर सॅमसंग गॅलॅक्सी नोट 10 सारखेच आहेत. मात्र, यामध्ये चौथा कॅमेरा देण्यात आला आहे. जो डेप्थ व्हिजन सेन्सर आहे. बॅटरी याफोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
किंमत गॅलेक्सी नोट 10 ची किंमत 69,999 रुपये असून नोट 10+ ची किंमत 79999 रुपये आणि 512जीबीची 89,999 रुपये एवढी आहे.